कोकण

लंगडी स्पर्धेत मांडकी शाळेने पटकावले विजेतेपद

CD

लंगडी स्पर्धेत मांडकी शाळेचे यश
‘यूथ गेम्स’; अथर्व धुमक ठरला उत्कृष्ट खेळाडू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः डेरवण येथील ‘यूथ गेम्स’ स्पर्धेत लंगडी क्रीडाप्रकारात जिल्हा परिषद मांडकी शाळेने सलग दहाव्या वर्षी विजेतेपद पटकावले. या शाळेचा अथर्व राजेंद्र धुमक याला यावर्षी उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.
तालुक्यातील मांडकी येथील जिल्हा परिषद शाळेने यावर्षी डेरवण येथील लंगडी स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला १२ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. गेली १० वर्षे या शाळेतील विद्यार्थी लंगडी स्पर्धेसाठी येत आहेत. त्या मुलांना शिक्षक रवींद्र घाणेकर, मुख्याध्यापिका मीना विचारे, विद्या कसबेकर व नुकतेच सेवानिवृत्त झालेले पदवीधर शिक्षक दत्तात्रेय नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात चिपळूण युनायटेड गुरुकुलने द्वितीय क्रमांक पटकावत ९ हजार रुपयांचे पारितोषिकही मिळविले. १५ वर्षांखालील मुलींमध्ये पुणे ईगल्सने प्रथम क्रमांक व १२ हजार रुपयांचे पारितोषिक, तसेच रत्नागिरीच्या शिर्के हायस्कूलने द्वितीय क्रमांक व ९ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. या स्पर्धेत पुणे विभागाची तेजल नितीन सोनार ही उत्कृष्ट खेळाडू ठरली. तसेच १२ वर्षांखालील मुलांमध्ये पुणे येथील रमणबाग यांनी प्रथम क्रमांक व १२ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर चिपळूणच्या गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय क्रमांक व ९ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत पुणे रमणबागचा विराज नीलेश देशमुख हा उत्कृष्ट खेळाडू ठरला.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT