कोकण

राजापुरात ६५ टन कचरा संकलित

CD

- rat३p८.jpg-
२६O२८२३८
राजापूर : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राजापूर शहरात राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान.
------
राजापूर परिसरातून ६५ टन कचरा संकलित
श्रीसदस्यांकडून स्वच्छता ; तळ्यातील सहा टन चिखल उपसला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने राजापूर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामुळे संपूर्ण राजापूर शहर आणि परिसराने मोकळा श्वास घेतला. या मोहिमेत राजापूर आणि लांजा तालुक्यातील ६७६ श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. शहरातील १३ प्रमुख ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २४.५ कि.मी. लांबीचे रस्ते आणि ६६०० चौरस मीटर परिसराची झाडलोट करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेतून तब्बल ६५ टन कचरा संकलित करण्यात आला.
श्रीसदस्यांनी लक्ष्मी नारायण मंदिर परिसरातील नागरिकांच्या वापराच्या तळीतील सुमारे सहा टन चिखल उपसून ती स्वच्छ केली. तसेच कोंढेतड येथील सार्वजनिक तळी आणि विविध धार्मिक चव्हाट्यांचीही स्वच्छता केली. शहरातील वैशंपायन पूल, ओगलेवाडी रस्ता, गोठण मैदान, होळीमांड, एसटी डेपो परिसर, कोदवली साईनगर यांसह विविध अंतर्गत रस्त्यांवरील कचरा पूर्णपणे हटवण्यात आला.
यावेळी नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांनी प्रत्येक प्रभागात ‘स्वच्छता दूत’ नेमून स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. नगरसेवक सौरभ खडपे यांनीही श्रीसदस्यांच्या कार्याबद्दल आभार मानले. या अभियानात भालावली, गावडे आंबेरे, नाटे, नाणार, सागवे, खारेपाटण, कोदवली, केळवली, राजापूर, लांजा, दोनिवडे, बाकाळे येथील श्रीसमर्थ बैठकीतील हजारो श्रीसदस्य, नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
कोट
येत्या १ एप्रिल २०२६ रोजी राजापूर नगरपरिषद १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या दीडशताब्दी महोत्सवी वर्षात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी प्रतिष्ठानचे सहकार्य लाभावे.

- ॲड. हुस्नबानू खलीफे, नगराध्यक्ष, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT