कोकण

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

CD

ग्लोबल स्कूलमध्ये
मराठी भाषा दिन
रत्नागिरी : मराठा मंदिर ग्लोबल स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचे जनक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाषण, समूहगीत, नृत्याविष्कार आणि मराठी भाषेवरील नाटक सादर करण्यात आले. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी लेझिम व ढोलताशांच्या गजरात दिंडीत सहभाग घेतला. मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा मानवी देखावा, वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व साहित्यिक व्यक्तिरेखा साकारून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल, मराठा मंदिरचे सदस्य संतोष नलावडे, सेक्रेटरी ममता नलावडे तसेच मुख्याध्यापिका अद्विका कामेरकर, समन्वयक अनिशा मुळ्ये अधिश्री नाचणकर उपस्थित होत्या.
----------
जीजीपीएसमध्ये
मराठी राजभाषा दिन
रत्नागिरी : जीजीपीएस शाळेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा झाला. या प्रसंगी मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला. ज्येष्ठ शिक्षिका सुविधा तोडणकर आणि संगीत शिक्षक विजय रानडे उपस्थित होते. प्रज्ञा सप्रे यांनी कुसुमाग्रज आणि मराठी अभिजात भाषेचा दर्जा या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. भरत इदाते यांनी कुसुमाग्रजांची ''कणा'' ही कविता सादर केली. त्याचबरोबर काही शालेय विद्यार्थ्यांनी मराठी दिनानिमित्त नाट्यछटा यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनवा विलणकर यांनी केले.
-------
जाणीव फाउंडेशनतर्फे
शनिवारी रक्तदान शिबिर
रत्नागिरी ः रक्तदाता सूची व रक्तदान शिबिरांद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या जाणीव फाउंडेशन, रत्नागिरी (नोंदणीकृत) आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभाग यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. ७) रोजी हे शिबिर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात होणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ अशी शिबिराची वेळ आहे. तुमचे एक रक्तदान अनेकांचे जीवन वाचवू शकते. या जीवन यज्ञात सर्वांनी सहभावी व्हावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी केले आहे.

------------

जीजीपीएसमध्ये
जोशी स्मृतिदिन
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष अरूअप्पा जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीजीपीएस शाळेमध्ये चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन रेखाटन कलाकार ऋषिकेश भाटवडेकर यांनी केले. पहिलीपासून नववीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या हस्तकलेच्या वस्तू व निसर्गचित्र, व्यक्तीचित्र यांचा या प्रदर्शनामध्ये समावेश होता. विद्यार्थ्यांतील हे कलागुण पाहून त्यांना मार्गदर्शन करणारे विश्वेश टिकेकर तसेच अपर्णा जमादार यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर व पालक यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग दाखवण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्याचा प्रयत्न केला गेला.

-----

खेर्डीत १५ पासून
कबड्डी स्पर्धा

चिपळूण : श्री ग्रामदेवी सुखाई देवी यात्रोत्सवानिमित्त श्री सुखाई देवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ खेर्डी यांच्यावतीने १५ ते १७ मार्च या कालावधीत कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच १७ मार्च रोजी रात्री १० वा. श्रीराम नाट्य नमन मंडळ कामथे यांचा ‘‘तळपता सूर्य साक्षीला अर्थात चाहूल लागली वाघदरीच्या जखमी वाघाला’’ हा पारंपरिक नमन कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामस्थांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुखाई देवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ खेर्डी यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT