कोकण

‘मराठी’ टिकली तरच संस्कृती सुरक्षित ः रवींद्र करंदीकर

CD

swt47.jpg मध्ये फोटो आहे.
पुरळ-हुर्शी ः येथील शेतकरी वाचनालय येथे मराठी गौरव दिन कार्यक्रमात बोलताना रवींद्र करंदीकर. सोबत श्रीमती तिर्लोटकर, संजीवनी फडके व विद्यार्थी वर्ग.

‘मराठी’ टिकली तरच संस्कृती
सुरक्षित ः रवींद्र करंदीकर

पुरळ-हुर्शी येथे मराठी गौरव दिन

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ४ ः मराठी ही आपली मातृभाषा आहे. या भाषेमुळे माणसाच्या संस्कृतीची ओळख टिकून राहते. म्हणून आपली मातृभाषा जपूया, टिकवूया आणि वाढवूया, असे प्रतिपादन रवींद्र करंदीकर यानी व्यक्त केले. ते पुरळ-हुर्शी येथे शेतकरी वाचनालय तथा (कै.) बाळासाहेब दीक्षित ग्रंथालयामध्ये आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलत होते.
पुरळ-हुर्शी येथील शेतकरी वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. करंदीकर यांनी उपस्थितांना मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अनमोल आहे. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकणार असून यासाठी सर्वांच्या एकजुटीची नितांत आवश्यकता आहे.’’
या कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. करंदीकर यांनी माय मराठीचे मोठेपण व्यक्त करणारी कविता सादर केली. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ-हुर्शीच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन केले. सान्वी मुळम या छोट्या विद्यार्थिनीने मधुर आवाजात कविता सादर केल्या. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सिद्धी रानडे यांनी संकर्षण कराडे यांची ''आई'' व कुसुमाग्रजांची ''कणा'' या दोन्ही कवितांचे उत्तम सादरीकरण केले. संजीवनी फडके यांनी त्यांची स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी फडके यांनी केले. आभार सिद्धी रानडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयातील कर्मचारी सिद्धी रानडे, सेजल शिंदे, श्रध्दा बाणे यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20I World Cup 2026: भारताचा सराव सामन्यात दमदार विजय; राधा-श्रेयंकाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने टेकले गुडघे

Thane News: कल्याणमध्ये ऐतिहासिक शिल्पांचा शोध, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडला

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT