कोकण

चिपळूण ःअपघातानंतर महामार्ग विभागाला जाग

CD

RATCHL41.JPG
28580
चिपळूण ः नाल्याची पाहणी करताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी.
------------

अपघातानंतर महामार्ग विभागाला जाग
लोखंडी रेलिंग, कठडा उभारणार; बहादूरशेख नाक्यातील अपघातग्रस्त भागाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः शहरातील बहादूरशेख नाका येथील मुत्तप्पन मंदिर गेट परिसरात महामार्गालगत असलेल्या खोल नाल्यात दुचाकी कोसळली. गेल्या दोन महिन्यात हा चौथा अपघात घडल्यानंतर पालिका पदाधिकारी अधिकारी व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी संयुक्तपणे पाहणी केली. एक-दोन दिवसात येथे लोखंडी रेलिंग अथवा सिमेंटचा कठडा उभारण्याचे ठरवण्यात आले.
शिमगोत्सवासाठी पुण्याहून संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे घरी निघालेला तरुण बहादूरशेखनाका मुत्तप्पन मंदिर गेटजवळील नाल्यात दुचाकीसह कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. गेल्या दोन महिन्यात येथे चार अपघात झाले आहेत. येथे रस्ता अरूंद आहे शिवाय रस्ता आणि नाल्यांची उंची सारखीच आहे. नाल्याच्या कडेला संरक्षक कठडा नसल्याने थेट वाहने नाल्यात कोसळत आहेत. एक रिक्षादेखील येथे कोसळली होती. येथे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सातत्याने अपघात होऊनही कोणत्याच हालचाली होत नसल्याने त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले होते. वाहनचालकांचा जीव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह नागरिकांनी केला.
अखेर बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्याम खुणेकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका अंजली कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार आदींनी पाहणी केली. या वेळी ठेकेदाराचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. महामार्गालगत नाला असून तो समपातळीत आहे. काही वेळा येथून एकेरी वाहतूक सुरू असते. अशावेळी वाहने नाल्यात कोसळण्याचा संभव अधिक आहे. रात्रीच्यावेळी नाला दिसून येत नाही. त्यामुळे येथे संरक्षक कठडा उभारण्यावर एकमत झाले. दोन दिवसात हे काम करणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : नेपाळची सार्वत्रिक निवडणूक ५ मार्च रोजी होणार

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT