कोकण

संगमेश्वर-देवरुख एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले

CD

देवरूख एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले
दहावी परीक्षेचे विद्यार्थी रखडले; सायले पंचक्रोशीतील प्रवाशांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः ऐन शिमग्याच्या धामधुमीत एसटी प्रशासनाने दुर्गम भागातील एसटी प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळवले. मागील काही दिवसांपासून ही अनागोंदी सुरू झाली आहे. सायले-काटवली पंचक्रोशीतील नागरिकांना संगमेश्वरला जाण्यासाठी सुरू केलेली एसटीची फेरी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द
करण्यात येते. याबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून देवरूख-सायले-बोरसुत ही एसटीची फेरी रद्द करण्यात आली. सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तासनतास एसटीच्या प्रतिक्षेत प्रवासी उभे असतात. याबाबत देवरूख आगारात चौकशी करता फोन केला तर आगारात गाड्या नाहीत, असे उत्तर दिले जाते.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. बुधवारी (ता. ४) सायले पंचक्रोशीतील जवळजवळ ३२ विद्यार्थी देवरूख येथील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी एसटीची वाट पाहत होते; पण आज देवरूख आगारात एसटी उपलब्ध नसल्याची माहिती कळताच पालक आणि विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले.
आगार व्यवस्थापक मधाळे यांनी फोनही घेतला नाही. त्यानंतर रत्नागिरी येथील डीटीओ यादव यांच्याशी पालकांनी फोनवरून परिस्थितीची समज दिली. पावणेदहा वाजेपर्यंत एसटीची वाट पाहून खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचवण्यात आले.

कोट
गेले काही दिवस देवरूख आगाराचा कारभार ढिसाळ झाल्याचे दिसून येत आहे. नादुरूस्त बस, बस वेळेवर न सुटणे, बसचे पत्रे बाहेर आलेले असणे, कोणतीही पूर्वकल्पना न देता बस रद्द करणे या कारभाराला प्रवासी कंटाळले आहेत. याबाबत देवरूख आगार व्यवस्थापकांना संपर्क केल्यास त्यांच्याकडून फोन घेतला जात नाही. असे प्रकार त्या वारंवार करत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांना माहितीच दिली जात नसेल तर दहावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
- रूपेश कदम, सामाजिक कार्यकर्ते, सायले, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : इराणी जहाजावर पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात १०१ जण बेपत्ता, ७८ जण जखमी

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT