‘सकाळ’ बातमीचा परिणाम - लोगो
कोकण आयुक्त घेणार
जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
डॉ. विजय सूर्यवंशीः ब्ल्यु फ्लॅगसाठीच्या कामांना देणार गती
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ : कोकणातील पाचही समुद्रकिनाऱ्यावरील ब्ल्यु फ्लॅगच्या कामांना गती मिळावी म्हणून संबंधित जिल्हाधिकारी, स्थानिक अधिकारी आणि नियुक्त एजन्सी यांची संयुक्त बैठक घेणार आहे, अशी माहिती कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
सोमवारी (ता. २) कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे गुहागरच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी तहसीलदार कार्यालय गुहागर येथे त्यांनी महसूलच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर गुहागरमधील कासव संवर्धन प्रकल्पाला भेट दिली. गुहागरमधील संकासूरचा नाच पाहिला. वेलदूर येथील मच्छीमारांबरोबर बैठक करून तेथील बंदराच्या समस्या जाणून घेतल्या.
कोकण आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सकाळ मध्ये प्रसिद्ध ब्ल्यु फ्लॅग मानांकनासदंर्भातील वृत्ताची दखल घेत गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या माध्यमातून डॉ. सूर्यवंशी यांनी पाटणकर यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी ते म्हणाले की, कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांवर ब्ल्यु फ्लॅग मानांकनाविषयी काम सुरू आहे. ही कामे गतीने होण्यासाठी जिल्हाधिकारी, तसेच संबंधित स्थानिक अधिकारी आणि नियुक्त एजन्सी यांची संयुक्त बैठक घेणार आहोत. या महत्त्वाच्या मानांकनासाठी शासनाबरोबरच स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्यदेखील आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.