rat4p9.jpg
28553
राजापूर ः बांबू रोपांच्या नर्सरीची प्रगतशील शेतकरी वासुदेव घाग यांच्यासमवेत पाहणी करताना कृषी विस्तार अधिकारी प्रथमेश पाटील.
rat4p10.jpg-
राजापूर ः रूजून आलेले बांबूचे रोप.
राजापूर ः रूजून आलेले बांबूचे रोप.
----------------
सौंदळमध्ये शेतकऱ्याने उभारली बांबू रोपांची नर्सरी
सिंधुरत्न योजनेतून सहाय्य अन् दापोली विद्यापीठाचे मार्गदर्शन; तीन हजार रोपांची रुजवण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः शासनाच्या सिंधुरत्न योजनेच्या सहाय्यातून आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुक्यातील पहिली खासगी बांबू रोपांची नर्सरी सौंदळ येथे उभी राहिली आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सौंदळ येथील प्रगतशील शेतकरी वासुदेव घाग यांनी बांबू रोपांची नर्सरी उभी केली आहे. या नर्सरीमध्ये सध्या माणगा आणि बोरबेट या प्रजातीच्या तीन हजार रोपांची रुजवण झाली आहे.
गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदळ येथे बांबू नर्सरीची उभारणी झाली आहे. त्यासाठी प्रगतशील शेतकरी घाग यांना कोकण कृषी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे अजय राणे, गटविकास अधिकारी म्हेत्रे, पंचायत समितीच्या कृषी विभागातील विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे, प्रथमेश पाटील, प्रदीप सावंत यांचे मार्गदर्शन आहे.
प्रतिकूल हवामान, पुरेसे मनुष्यबळाचा अभाव आदी विविध कारणांमुळे आंबा-काजू लागवडीसह भातशेतीचे अर्थकारण बिघडू लागले आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून कमी श्रमामध्ये हमखास जादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचेही शेतकऱ्यांना बळ मिळत आहे. बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असताना स्थानिक पातळीवर बांबूची रोपे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सिंधुरत्न योजनेतून तालुक्यातील सौंदळ येथील घाग यांनी बांबू रोपांच्या नर्सरीची उभारणी केली आहे. या नर्सरीमध्ये तीन हजार रोपांची रुजवण केली आहे. यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला ही रोपे लागवडीसाठी उपलब्ध होणार असून, याचा लाभ घेत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केले आहे.
दृष्टिक्षेपात...
* बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार
* जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत सुरू राहते
* लागवडीनंतर नियमितपणे उत्पन्न सुरू
* देखभालीसाठी खर्च कमी, मात्र उत्पादन जादा
* बांबूला औद्योगिकदृष्ट्या महत्त्व
* कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो, वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्यास मदत
* जमिनीची धूप थांबण्यासह जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.