हॉटेल व्यावसायिकांवरील कर
वाढविण्याचा खेडमध्ये निर्णय
पालिका सभा; नगराध्यक्ष घेणार नवीन वाहन
खेड, ता. ४ : येथील पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना झटका देण्यात आला. कर वाढवण्याचा निर्णय पहिल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या विहिरी गाळाने भरल्या आहेत. काही विहिरी नादुरूस्त झाल्या आहेत. या विहिरींची तातडीने दुरूस्ती करून साफसफाई करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत पहिल्याच सर्वसाधारण सभेत निश्चित करण्यात आले. याचवेळी नगराध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदीचाही ठराव मंजूर केला आहे.
निवडणुकीनंतर नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा झाली. या सभेस उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, सर्व विषय समित्यांचे सभापती, मुख्याधिकारी उपस्थित होते. पालिकेचे अग्निशमन वाहन कालबाह्य झाले आहे. या वाहनाची मुदत संपुष्टात आली आहे. यामुळे जुनी अग्निशमन वाहन निर्लेखित करून नवीन वाहन खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. प्रभाग १ ते १० मध्ये मोकळ्या जागेत ओपन जिम तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी शहरातील सामाजिक व वित्तीय संस्थांकडून अर्ज मागवण्याचे निश्चित करण्यात आले.
शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज भाजीमंडईतील १ ते ९ गाळे व १ ते ३१ कट्टे यांची मुदत संपली आहे. त्यांचा पुन्हा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरोत्थान योजनेंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षातील कामांची निवड निश्चित करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. वृक्ष समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. शहरातील अण्णाचा पऱ्या ते योगिता दंत महाविद्यालयापर्यंत रस्ता रूंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड हायब्रिडन अन्युटी मॉडेल योजनेंतर्गत सुरू आहे. या रस्ता रूंदीकरणाचे क्षेत्र ताब्यात घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
चौकट
कुत्र्यांसाठी शेल्टर होमबाबत ठराव
शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांसह पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्याच्या निर्णयावर चर्चा करून भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम बांधण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
चौकट
दाखले, उताऱ्यांच्या शुल्कात वाढ
नगरपालिकेतील विविध दाखले, उतारे यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.