जिल्ह्यामध्ये पुरेसा इंधन
साठा ः जिल्हाधिकारी
अफवांवर विश्वास ठेवू नये
ओरोस, ता. ४ ः मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या तिन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी व समन्वयकांशी संपर्क साधल्यानुसार जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप व गॅस एजन्सींकडून इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. सर्व नागरिकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सेवेस तत्पर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.