कोकण

द्राक्ष वाईनप्रमाणे कोकणातील ''फळ वाईन''ला सवलती द्या

CD

द्राक्षाप्रमाणे ‘फळ वाईन’ ला सवलती द्या
आमदार शेखर निकम यांची मागणी; फळप्रक्रिया उद्योगाला उभारी मिळणे शक्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५-२६ मध्ये कोकणातील फळप्रक्रिया उद्योगाला उभारी देण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित केला. नाशिकच्या द्राक्ष वाईनला ज्या धर्तीवर शासकीय सवलती आणि करमाफी दिली जाते त्याच धर्तीवर कोकणातील आंबा, काजू, फणस, जांभूळ आणि करवंद यांपासून तयार होणाऱ्या वाईनला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
अधिवेशनात बोलताना आमदार निकम यांनी आकडेवारीसह सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘द्राक्ष वाईन निर्मितीसाठी राज्य सरकारकडून विविध करसवलती, परवाना शुल्कात सवलत आणि विक्रीकेंद्रांना विशेष प्रोत्साहन दिले जाते; मात्र, याउलट कोकणातील स्थानिक फळांपासून वाईन बनवणाऱ्या उद्योजकांवर एक्साईज शुल्काचा तब्बल ३०० पट अधिक बोजा टाकला जात आहे. यामुळे कोकणातील नवउद्योजक या व्यवसायात उतरण्यास कचरत असून, अस्तित्वात असलेले उद्योगही आर्थिक अडचणीत आले आहेत.’’
कोकणात सध्या आंबा, काजू, फणस यासोबतच रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभूळ आणि करवंदापासून वाईन निर्मितीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जर सरकारने द्राक्ष वाईनप्रमाणेच करसवलत, परवाना सुलभता, स्वतंत्र विक्री धोरणनिश्चित केले तर हा उद्योग कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरू शकतो, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अर्थसंकल्पातील या मागणीमुळे कोकणातील फळ उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या धर्तीवर कोकणसाठी स्वतंत्र ‘वाईन पॉलिसी’ जाहीर झाल्यास हा भाग खऱ्या अर्थाने ‘कॅलिफोर्निया’ ठरेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

चौकट
शेतकरी आणि पर्यटनाला होईल फायदा
फळ वाईन उद्योगाला चालना मिळाल्यास केवळ उद्योगच वाढणार नाहीत तर आंबा, काजू बागायतदारांना हक्काची बाजारपेठ मिळेल. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून तरुणांना काम मिळेल, ‘वाईन टुरिझम’च्या माध्यमातून कोकणच्या पर्यटनात नवी भर पडेल, असे आमदार निकम यांनी सभागृहात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT