कोकण

खेड- डेरवण युथ गेम्स

CD

rat4p11.jpg-
28569
डेरवण ः बॅडमिंटन स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंसह, प्रशिक्षक व मान्यवर.
------------


सांगली, सातारा जिल्ह्याचे
बॅडमिंटन स्पर्धेत वर्चस्व
चिपळूण, ता. ४ : डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात सुरू असलेल्या डेरवण यूथ गेम्समधील बॅडमिंटन स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व राखताना तेथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या श्लोक भोसले याने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके पटकावली.
या स्पर्धेत सांगली जिल्ह्यानेही चमक दाखवली येथील एम. एस. तरसे हिने मुलींच्या १३ व १५ वयोगटाखालील दोन्ही गटांमध्ये सुवर्णपद‌के पटकावली. तसेच साताऱ्याच्या सौरभ चव्हाण बॅडमिंटन अॅकॅडमीची गौरी गोंदकर हिने ११ वर्षीय मुलींच्या गटात सुवर्ण व १३ वर्षांखालील मुलीच्या गटात कास्यपदक मिळवले. सांगलीच्या आर. बी. पी. बॅडमिंटन अॅकॅडमीचा समर्थ सावंत याने १५ वर्षांखालील मुलांच्या गटात कास्य, तर १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळवले. मुंबईची अनुश्री मोडलिंबकर हिने मुलींच्या १३ व १५ वयोगटात रौप्यपदक पटकावले.
बॅडमिंटन स्पर्धेच्या ११ वर्षांखालील मुलींच्या गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या एफ. एस. क्लबची निरजा पवार हिने रौप्य व याच क्लबच्या स्वरा कोळी हिने कास्यपदक मिळवले. मुलांच्या ११ वर्षीय गटामध्ये सातारा जिल्ह्यातील उंब्रज (कराड) येथील एससीबीएच्या रियांश राऊत याने सुवर्ण तर सिंधुदुर्गच्या आरपीबी बॅडमिंटन अॅकॅडमीच्या कुणाल जेजुरकर याने रौप्य आणि अभिनव प्रशालेच्या दुर्वांक सावंत याने कास्यपदक मिळवले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या रॉयल इंग्लिश स्कूलचा विराज आर्जुगडे याने रौप्य तर सिंधुदुर्गच्या खेलो इंडिया सेंटर स्कूलच्या ऋषांक कुलकर्णी याने कास्यपदक मिळवले. मुलींच्या १५ वर्षांखालील गटात साताऱ्याच्या सौरभ चव्हाण अॅकॅडमीची मीरा तोडकरने कास्यपदक पटकावले. मुलांच्या १५ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आराध्य पवारने रौप्यपदक मिळवले. मुलांच्या १७ वर्षांखालील गटामध्ये सिंधुदुर्गच्या वेतोरा हायस्कूलच्या साईराज सामंत याने सुवर्ण तर जी. व्ही. पब्लिक स्कूलच्या वेदांत पोयेकर याने कास्यपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT