कोकण

रत्नागिरी- करसल्लागार असोसिएशनतर्फे आयकर चर्चासत्राला प्रतिसाद

CD

rat4p1.jpg-
28482
रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा या संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्रात बोलताना अध्यक्ष रमाकांत पाथरे. सोबत सीए संजय व्हनभट्टे व मान्यवर.

करसल्लागार असोसिएशनतर्फे
आयकर चर्चासत्राला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ४ : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने आयकर कायदा २०२५ विषयावर दोन दिवसीय सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे सेमिनार झाला. या कार्यक्रमास सुमारे १२० सभासदांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
या सेमिनारचे संयुक्त आयोजन गुड्स ॲण्ड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग तसेच ऑल गोवा टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांच्या सहकार्याने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आयकर अधिकारी अमरदीप कुमार उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील प्रख्यात सीए संजय व्हनभट्टे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आयकर कायदा २०२५ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी आणि त्याचा करदाते व करप्रवर्तकांवर होणारा परिणाम या विषयी सविस्तर माहिती दिली.
करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हाचे अध्यक्ष रमाकांत पाथरे यांनी प्रास्ताविक करताना संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग व गोवा येथील संघटनांच्या अध्यक्षांनीही मनोगत व्यक्त करत परस्पर सहकार्य व व्यावसायिक एकात्मतेचे महत्त्व सांगितले. अ‍ॅड. रवींद्र साळवी, धनेश रायकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आजी- माजी समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा सेमिनार करप्रवर्तकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. सभासदांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे व्यावसायिक ज्ञान वृद्धिंगत होऊन करप्रणाली अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT