कोकण

टेबल टेनिस स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व

CD

टेबलटेनिस स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व
चिपळूण, ता. ४ : तालुक्यातील डेरवण येथील यूथ गेम्समधील टेबलटेनिस या क्रीडाप्रकारात साताऱ्याच्या आरव देशमुखने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील स्पर्धेत सुवर्णपद‌के पटकावून वर्चस्व राखले आहे. तसेच साताऱ्याच्या श्रावणी माईन हिने मुलींच्या १५ वर्षांखालील गटात सुवर्ण व १३ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळवले. साताऱ्याच्याच गौरी नाईक हिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात सुवर्ण व १५ वर्षांखालील गटात कास्यपदक मिळवून या स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व राखले आहे.
या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या वर्षा परूळेकर हिने मुलींच्या १५ व १७ वयोगटाखालील गटांमध्ये रौप्यपदक तर कोल्हापूरच्या पुष्पम शहा याने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील गटांमध्ये रौप्यपदक पटकावले. मुलींच्या ११ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या श्रेया माईन हिने सुवर्ण, विभा घाडगे हिने रौप्य व अर्णिका काळे हिने कास्यपदक मिळवले. मुलांच्या ११ वर्षांखालील गटामध्ये शुभंकर जाधव याने सुवर्ण, प्रणव भोसले याने रौप्य व निरंजन पाटील याने कास्यपदक मिळवले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटामध्ये राजवीर पाटील याने कास्यपदक मिळवले. मुलींच्या १३ वर्षांखालील गटामध्ये सांगलीच्या आरोही चांदणे हिने सुवर्ण व मुक्ता शेवडे हिने कास्यपदक पटकावले. मुलींच्या १७ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या गौरी नाईक हिने सुवर्ण व स्वरा भस्मे हिने कास्यपदक मिळवले आहे. मुलांच्या १७ वर्षांखालील गटामध्ये सिंधुदुर्गच्या लौकिक तळवडेकर याने सुवर्ण, कोल्हापूरच्या वेदांत पुजारी याने रौप्य व कुणाल बारटक्के याने कास्यपदक मिळवले तर मुलांच्या १५ वर्षांखालील गटामध्ये राजवीर गायकवाड याने कास्यपदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Kolhapur Viral Video Case : कोल्हापूर शिरोली अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील नवी अपडेट समोर, शाहरुख निघाला सरकारी नोकर

Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानमधलं तेलं संपलं! खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले भारताला एका सहीवर...

Video Viral: रियान परागवर बंदी? ड्रेसिंगरूममध्ये 'व्हॅपिंग' करताना दिसला; BCCI कठोर कारवाईच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

SCROLL FOR NEXT