

Riyan Parag Video Viral | IPL 2026
Sakal
IPL 2026, RR vs SRH Video Viral: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने मंगळवारी (२८ एप्रिल) पंजाब किंग्सचा विजयी रथ रोखला. मुल्लनपूरला झालेल्या सामन्यात पंजाबला राजस्थानने ६ विकेट्सने पराभूत केले.
मात्र या सामन्यादरम्यान राजस्थानचा कर्णधार रियान पराग (Riyan Parag) वादात अडकण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राजस्थानचे संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर हे डगआऊटमध्ये बसले असताना मोबाईलचा वापर करत असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. आता रियानवरही कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.