विकास निधीत ३३ कोटींची भर
जिल्ह्यास एकूण ४३९ कोटी ; सुविधांना मिळणार गती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या २०२६-२७ च्या विकास आराखड्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. जिल्हा नियोजन समितीने सुरुवातीला ४०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, मात्र मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निधीमध्ये आणखी ३३ कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे आगामी वर्षात जिल्ह्यासाठी ४३९ कोटी रुपयांचा विकास निधी मिळणार आहे. हा वाढीव निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्न केले.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक गरजा आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जादा निधीची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन सरकारने ३३ कोटी रुपये वाढवून दिले आहेत. या वाढीव निधीमुळे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे.
दरम्यान, मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करून दिलेला निधी वेळेत खर्च व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समिती आता युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. हा निधी १०० टक्के खर्च होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
----
चौकट
...तर जिल्हा परिषदेकडे वर्ग
नव्या वर्षाचा निधी मंजूर झाला असताना जिल्हा प्रशासनासमोर चालू आर्थिक वर्षातील (२०२५-२६) शिल्लक निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मार्च महिना संपायला आता काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. नियमानुसार, जर हा मंजूर निधी ३१ मार्चपर्यंत खर्च झाला नाही, तर तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा लागतो. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सध्या या निधीचा विनियोग करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.