swt57.jpg
28765
वेंगुर्ले ः गटनेते विष्णू फणसेकर यांचा सत्कार करण्यात आला.
महायुतीच्या नऊ सदस्यांचा
‘वेंगुर्ले विकास आघाडी’ गट
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः वेंगुर्ले पंचायत समितीच्या भाजप, शिंदे शिवसेना व अपक्ष अशा नऊ सदस्यांनी ‘वेंगुर्ला तालुका विकास आघाडी’ गट बुधवारी (ता. ४) स्थापन केला. भाजपचे म्हापण पंचायत समिती सदस्य विष्णू उर्फ आपा फणसेकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना याबाबतचे पत्र सादर करण्यात आले.
भाजपचे विष्णू फणसेकर (म्हापण), शीतल राऊत (वायंगणी), शंकर घारे (मातोंड), संकेत धुरी (आसोली), प्रियांका घाटवळ (रेडी) तर शिंदे शिवसेनेचे सचिन देसाई (परुळे), सुचिता वजराटकर (वजराट), साक्षी नार्वेकर (उभादांडा) व महायुती पुरस्कृत नितीन मांजरेकर (आडेली) या ९ सदस्यांनी वेंगुर्ले तालुका विकास आघाडी गट स्थापन केला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी गटनेते फणसेकर यांचा सन्मान केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, शिवसेनेचे सूरज परब, वसंत तांडेल, ज्ञानेश्वर केळजी आदी उपस्थित होते.
.....................
swt58.jpg
28766
श्री देव चौकचार
मेढा येथे सोमवारी
वार्षिक ‘मांड’ उत्सव
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : शहरातील मेढा येथील चौकचार मांड येथे सोमवारी (ता. ९) वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा अर्चा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे तसेच रात्री ८ वाजता सामूहिक गाऱ्हाणे, १० वाजता कलावंतीण नृत्य व घुमट वादन, त्यानंतर स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार व शंकर मंदिर मेढा महिला मंडळ प्रस्तुत ‘रंगमेळा’ हा टाळनृत्य, लेझीम नृत्य व तुळशी नृत्याचा समावेश असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. १३) रात्री ९ वाजता ''वाडवळ'' भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.