कुंभार समाजातर्फे रविवारी गुणगौरव
कसाल येथे सोहळा ः ‘समाजरत्न’सह विविध पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाचे समाजरत्न व समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारांचे वितरण रविवारी (ता. ८) सकाळी १० वाजता कसाल हायस्कूल येथे करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुभार यांनी दिली. पुरस्कारासाठी दिलीप हिंदळेकर व विश्राम पाटकर यांची निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समन्वय समितीची सभा अध्यक्ष चंद्रकांत कुभार यांच्या अध्यक्षतेखाली कसाल येथे झाली. यावेळी समाजभूषण व समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना ज्येष्ठ समाजसेवक पुरस्कार, समाज गौरव, युवा समाज गौरव, वारकरी पुरस्कार, दशावतार कला गौरव आदी पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. पारंपरिक कुंभार कला जोपासणाऱ्यांना, मूर्तिकाम करणाऱ्या कलाकारांना विशेष प्राविण्य प्राप्त समाज बांधवांना पोलिसपाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष सतीश कुंकळीकर, संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर, आमदार गोवा प्रमेंद्र शेठ (अध्यक्ष, कोकण विभाग), प्रकाश साळवी उपस्थित राहणार आहेत. (कै.) मधुकर कुडाळकर व (कै.) शांताराम पाटकर यांना मरणोत्तर समाज गौरव पुरस्काराने तर दिलीप सांगवेकर, साबा पाटकर, गंगाराम माणगावकर, धोंडू पार्लेकर, अनिल शेटकर, बाबा वर्देकर, एच. डी. चिंदरकर, मनोहर कुंभार, वासुदेव शिरोडकर, काशिनाथ तेंडोलकर, सुहास गोठणकर, सतीश चिंदरकर, पुरुषोतम हरमलकर, गुरुनाथ हरमलकर यांना ज्येष्ठ समाजसेवक पुरस्कार, विजय पाटकर, नारायण माणगावकर, श्यामसुंदर कुंभार, गोपाळ मांजरेकर यांना वारकरी पुरस्कार, आनंद कुंभार, काशिकल्याण दशावतार नाट्यमंडळ, मळेवाड यांना दशावतार कलागौरव, उदय मांजरेकर, सुशील चिंदरकर, गोपाळ हरमलकर, संतोष कुंभार, मनोज वाटेगावकर, संदेश तुळसणकर, सुरेश नांदीवडेकर यांना युवा गौरव, विलास मांजरेकर, अंकुश कुंभार, विकास हरमलकर, राजेंद्र कुडाळकर, शेखर कुडाळकर, ज्ञानेश चिंदरकर, अविनाश कुंभार, अजित कुंभार यांना कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष कुंभार, सचिव महेश कुंभार यांनी केले आहे. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास लकी ड्रॉ, पैठणीचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.