कोकण

राजापूर शहरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

CD

ग्राऊंड रिपोर्ट---------लोगो

- rat५p४.jpg -
२६O२८७६९
राजापूर ः छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये झालेली वाहतूक कोंडी.
- rat५p५.jpg -
P२६O२८७७०
राजापूर ः अशा दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकींमुळे रस्ते वाहतुकीसाठी ब्लॉक होतात

-------
राजापूर शहरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
‘नो पार्किंग’चे फलक बनले शोभेचे; रस्ता सुरक्षा समितीचा अहवाल धूळ खात
राजेंद्र बाईत : सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ : राजापूर शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून, नगरपालिकेने लावलेले ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरल्याचे चित्र दिसत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या पार्किंगसाठी हक्काची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कामानिमित्त येणारे नागरिक आपली वाहने थेट मुख्य रस्त्यावर किंवा दुकानांच्या समोर उभी करत आहेत. वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीने सविस्तर अहवाल आणि प्रस्ताव तयार केला होता. मात्र, दशक उलटूनही हा प्रस्ताव अंमलबजावणीअभावी लालफितीच्या कारभारात अडकून पडला आहे.

*अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग
राजापूर शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रमुख शासकीय कार्यालयांसह वैद्यकीय सुविधा, राजकीय पक्षांची कार्यालये शहरात आहेत. तसेच शाळा, दवाखानेही मोठ्या संख्येने असल्यामुळे ग्रामीण भागातून शासकीय कामासह अन्य विविध कामानिमित्ताने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. बहुसंख्य नागरिक खासगी वाहने घेऊन येतात. ते सर्वजण मोकळी आणि मोक्याची जागा दिसेल तिथे वाहने उभी करतात. अनेकदा बाजारपेठेत मोक्याची जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. तासन् तास वाहने रस्त्यावर राहिल्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेली बाजारपेठ आणि परिसरामध्ये वाहतूक कोंडी असताना तहसीलदार कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या समोर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केलेली असतात, त्यातूनही या ठिकाणी अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आणि गुरुवारी शहरामध्ये भरणारा आठवडा बाजार; या दिवशी शासकीय कामासह अन्य कामानिमित्ताने मोठ्या संख्येने येणाऱ्या नागरिकांकडून तहसीलदार कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर वाहने उभी केलेली असतात. ही वाहने या भागातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरताना दिसत आहेत. त्याचवेळी कोदवली नदीच्या काठावरील शिवाजी पथवर दोन्ही बाजूंना रिक्षा, दुचाकी, छोटे टेम्पो आणि माल उतरवण्यासाठी आलेल्या मोठ्या गाड्या पार्किंग करून ठेवलेल्या असतात. त्यातूनही शिवाजी पथ रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

*नो पार्किंग फलक ‘शोभेचे बाहुले’
ज्या भागामध्ये अनेकवेळा वाहतूक कोंडी होते, त्या जवाहर चौक ते तालीमखाना रस्ता, जवाहर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, जवाहर चौक ते नगर वाचनालय, नगर वाचनालय ते राजापूर हायस्कूल या भागांमध्ये ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. मात्र, या फलकांखालीच अनेकवेळा बिनदिक्कतपणे वाहने उभी केलेली असतात. त्यातून त्याच भागात वाहतूक कोंडी होते. परिणामी, ‘नो पार्किंग’चे फलक तयार करणे आणि त्यांच्या उभारणीसाठी पालिकेकडून केला जाणारा खर्च व्यर्थ जात आहे.


*ठोस उपाययोजनांची आवश्यकता
वर्षानुवर्षे भेडसावत असलेली शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजनांची आखणी होणे गरजेचे आहे. केवळ योजना आखून उपयोग नाही, तर तिची सकारात्मक दृष्टिकोनातून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याला वाहनचालकांसह ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. अन्यथा, वाहतूक कोंडी फोडण्याच्या उपाययोजनाही केवळ चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

*अहवाल लालफितीतच अडकून
रत्नागिरी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने जिल्ह्यातील सर्व शहरांतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि रस्त्यावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी दहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर अहवाल आणि प्रस्ताव तयार केला आहे. त्यात काही ठिकाणी एकदिशा मार्ग, प्रवेश बंद, पार्किंग, नो पार्किंग यांसंबंधित नवीन सुधारणाही सूचित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये राजापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या सविस्तर अहवाल आणि सुधारित प्रस्तावाचा समावेश आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या अहवालाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, नगरपालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील समन्वयाअभावी दशकभरानंतरही यावर कार्यवाही झालेली नाही. हा अहवाल केवळ लालफितीतच अडकून पडला आहे.


चौकट
दृष्टीक्षेपात राजापूर शहर
क्षेत्रफळ : ६.१९ चौ.कि.मी.
लोकसंख्या : १०,४९९
रस्त्यांची लांबी : ३५.२२ कि.मी.
---
वाहनांची अंदाजित संख्या (शहरातील):
दुचाकी : २५००
तीनचाकी : ५००
चारचाकी : ४५०
----
* वाहतूक कोंडीची ठिकाणे
जवाहर चौक परिसर
जवाहर चौक ते तालीमखाना रस्ता (नगर वाचनालय ते अर्बन बँक परिसर)
बाजारपेठ मुख्य रस्ता
मुन्शी नाका
तहसीलदार कार्यालय आणि पोलिस स्टेशनासमोरील रस्ता
शिवाजी पथ रस्ता
-------
* उपाययोजना
शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण.
कोदवली नदीशेजारील गाळाला भिंत बांधून पार्किंगची व्यवस्था करणे.
पर्यायी रस्त्यांचा विचार होणे गरजेचे.
पोलिस यंत्रणा आणि नगरपालिका प्रशासनाची सकारात्मक भूमिका महत्त्वाची.
वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांवर विशेष लक्ष देणे गरजेचे.
----
कोट १
‘राजापूर शहरामध्ये पार्किंग व्यवस्था नाही. स्वतंत्र जागा नसल्याने मिळेल त्या मोकळ्या जागेत वाहने उभी करावी लागतात. बाजारपेठेतील दुकानांपासून रस्ते दूर आहेत आणि रस्ता अरुंद असल्याने वाहन नेणे कठीण होते. अशावेळी खरेदीला गेलेल्या नागरिकांनी वाहने उभी कुठे करायची? यासाठी सुयोग्य पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे. शहराच्या भौगोलिक स्थितीचा विचार करून उपाययोजना व्हाव्यात.’
- प्रसाद शिंदे, वाहनचालक
-----
कोट २
‘दहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पोलिस यंत्रणेकडे सादर केलेला असून, त्यांच्याकडून होणाऱ्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील.’
- जितेंद्र जाधव, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात जमीन मोजणीची प्रक्रिया वेगवान होणार; महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला, नागरिकांना मोठा दिलासा

रश्मिकाच्या आईने नेसलेली कोडावा पद्धतीची साडी तुम्हाला माहित आहे का? साडीचा पदर अन् नेसण्याची पद्धत आहे फारच खास, Video

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

“५ दिवस झाले... आम्हाला घरी जायचंय, किमान कळवा तरी आज की उद्या जाता येईल!” भारतात अडकलेल्या खेळाडूचा धीर संपतोय...

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT