कोकण

नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा सुरू

CD

नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा सुरू
नगराध्यक्षांचा पुढाकार; खेडवासीयांना मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी पुढाकार घेतल्याने खेडवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गतवर्षी या नदीपात्रातून ३ हजार १६८ ब्रास (८ हजार ९६५ घनमीटर) गाळ उपसण्यात आला होता.
आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून सध्या जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे नारिंगी नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात शहरावर पुराची टांगती तलवार कायम असते. गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसण्यात न आल्याने ही समस्या गंभीर बनली होती.
गतवर्षी ‘नाम फाउंडेशनने दिलेल्या दोन पोकलेन मशिनच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. पावसाळ्यापूर्वी ३ हजार १६८ ब्रास गाळ काढल्याने पुराचा धोका काही अंशी कमी झाला होता. यंदाही जगबुडीपाठोपाठ नारिंगी नदीचा गाळ उपसा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अखेर नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी पुढाकार घेतल्याने नारिंगी नदीवरील देवणा पुलाखालील गाळ काढण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. या कामाच्या उद्‍घाटनप्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, रेश्मा खतीब, सुयश लंबाडे, सिद्धांत घटे, राकेश चव्हाण आदी उपस्थित होते.
----
पुराचा धोका होणार कमी
सुसेरी पुलापर्यंत गाळ उपसा पूर्ण झाल्यावर खेड शहरातील कासारआळी, ब्राह्मणआळी आणि सोनारआळी या भागांतील पुराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. हे लक्षात घेऊनच पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत असून, या पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण केले जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

SCROLL FOR NEXT