कोकण

दिव्यांगांना मिळाली निओ मोशनची यांत्रिक व्हीलचेअर

CD

rat५p७.jpg-
२६O२८८२२
रत्नागिरी : ‘आरएचपी फाउंडेशन’च्या माध्यमातून दिव्यांगांना यांत्रिक व्हीलचेअर मिळाली. सोबत सादिक नाकाडे.
---
दिव्यांगांना यांत्रिक व्हीलचेअर भेट
आरएचपी फाउंडेशनची मदत; ३० जणांना मिळणार लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.६: अतितीव्र दिव्यांग व्यक्ती म्हटली की डोळ्यासमोर येते ती दुसऱ्यावर अवलंबून असणारी व्यक्ती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब असहाय्य बनते. पण या संकल्पनेला स्वतः दिव्यांग असणारे सादिक नाकाडे यांनी छेद दिला. स्वतःची सर्व कामे स्वतः करताना आपल्यासारख्या इतर दिव्यांग व्यक्तींना ही त्यांनी जीवनाच्या प्रवाहात आणले. त्यांनी नुकतेच वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने दिव्यांगांना इलेक्ट्रिक व्हील चेअर गाड्या मिळवून दिल्या.
सादिक नाकाडे यांच्या प्रयत्नामुळे इतर अनेक दिव्यांग बंधू-भगिनी नवनवीन व्यवसाय आणि नोकरी करत आहेत. स्मिता पद्माकर पाटील, वरुण विश्वनाथ गोसावी आणि सुवर्णा दामले यांना आरएचपी फाऊंडेशनच्या माध्यमातून निओमोशनची व्हीलचेअर मिळाली. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे मिडटाऊन आणि ऑर्गनिझ ऑफ नॅशियो संस्था (चेंबूर) यांच्या सहकार्याने निओ मोशनची इलेक्ट्रिक व्हील चेअर मिळवून दिल्या. त्यामुळे या दिव्यांगांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होणार आहे.याप्रसंगी नाकाडे, स्मिता पाटील, स्वानंदी पाटील, सुवर्णा दामले, वरुण गोसावी, इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे मिडटाऊनचे पदाधिकारी ज्योतिका प्रेमनारायण, लक्ष्मी सिंग, हिरु थंडानी, ज्योती मणिपाल उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ३० जणांना व्हील चेअर गाड्या मिळणार आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT