swt523.jpg
28832
नरेश देऊलकर
आरोंद्यासह पंचक्रोशीतील
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा
नरेश देऊलकर ः वन विभागाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ४ ः आरोंदा पंचक्रोशीत सध्या वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आरोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील मुख्य पीक जरी भात शेती असली तरी आंबा, काजू, कोकम, केळी, माड बागायती हे उत्पन्नाचे स्त्रोत देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या पिकांवर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था निर्धारित आहे. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानामुळे फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत चालले आहे. प्रामुख्याने रानगवे, माकड यांच्या उपद्रवामुळे शेती व्यवसायाकडे आणि फळबागायतीकडे शेतकरी पाठ फिरवू लागला आहे.
वन्य प्राण्यांपासून शेती कशी सुरक्षित राहील, यासाठी वनविभाग व शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी कायद्यात व नियमात शिथिलता आणावी. शासनाकडून मिळणारी भरपाई अत्यंत तटपुंजी आहे. याबाबत योग्य उपाय योजना करून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.