कोकण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

CD

प्रमाण मराठीच्या विविध बोलींचे संवर्धन व्हावे
रत्नागिरी : प्रमाण मराठीच्या विविध बोलींचे संवर्धन करणे गरजेचे असून, मराठी भाषेचा आदर करताना अन्य भाषांचा अनादर करू नये असे प्रतिपादन मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वेश जोशी यांनी फाटक हायस्कूल व गांगण- केळकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केले. जुई जोशी हिने मराठी अभिमान गीत सादर केले. कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांचा परिचय या निमित्ताने विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. नाट्य उताऱ्याचे अभिवाचन अन्वय बोरकर याने, निधी भडेकर हिने लावणीचे सादरीकरण, तर शमिका शेवडे आणि वेदश्री सातवळेकर यांनी अभंग गायन केले. मराठी भाषेच्या जन्माची कथा सिद्धी मोडक हिने सादर केली. याप्रसंगी तपस्या बोरकर आणि कल्याणी चव्हाण यांनी भाषाभिमान व्यक्त करणारे मनोगत केले. सूत्रसंचालन हर्षदा केळकर हिने केले. वेदा प्रभूघाटे हिने आभार मानले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या डीजीके वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आठल्ये, सप्रे, पित्रे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सरदार पाटील उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावर मार्गदर्शन केले. या मध्ये क्रेडिट स्ट्रक्चर, फिल्ड प्रोजेक्ट, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम, ऑन जॉब ट्रेनिंग या विषयांची निवड याबद्दल माहिती दिली. शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला वरीष्ठ महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, राष्ट्रीय शिक्षण धोरण समिती प्रमुख वैभव घाणेकर, सर्व शाखेचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

तिरंगी क्रिकेट स्पर्धेत छोटू देसाई संघ विजयी
रत्नागिरी : छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी, तळणीनी येथील विद्यार्थ्यांनी तिरंगी क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा मुंबई येथील एम.सी.ए. मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग या तीन संघांचा सहभाग होता. या स्पर्धेत कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्तम फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अंतिम सामन्यात अकॅडमीच्या संघाने दमदार खेळ करत विजेतेपद मिळवले. या विजयामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकॅडमीचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्याने सराव करून ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

भाग्यदेवी चौगुले यांना रणरागिणी पुरस्कार
संगमेश्वर ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ईगल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ''रणरागिणी'' पुरस्कार श्रीमती भाग्यदेवी बाबूराव चौगुले यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमती चौगुले या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून जबाबदारी निभावत असतानाच त्यांनी विविध विषयांमध्ये मास्टर डिग्री संपादन केली. शिक्षण क्षेत्रातील त्यांची जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तापूर्ण योगदान लक्षात घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मानाचा फेटा असे आहे. हा पुरस्कार महिला दिनाला कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT