- ratchl५३.jpg-
P२६O२८८४४
चिपळूण - चिंचनाका ते पॉवर हाऊस दरम्यानचा रस्ता नेहमीच वर्दळीचा राहिला आहे.
----
चिपळूण शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण
नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक ; जागा मालक, इमारत मालक साशंक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी पालिकेने महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संबंधित जागा मालकांची बैठक ९ मार्च रोजी पालिकेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
यापुर्वीच संबंधित जमिन मालक तसेच इमारत धारकांना नोटिसा दिल्या आहेत. चिंचनाका ते बहादूरशेखनाका, चिंचनाका ते पॉवर हाऊस आणि अमेय पार्क ते गांधारेश्वर पूल दरम्यानचे तीन रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पुढाकार घेत शहरातील महत्त्वांच्या रस्ता रुंदीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात सर्वाधिक वाहतुकीची वर्दळ असलेले हे परिसर आहेत.
शहर विकास आराखड्यात या तिन्ही रस्त्यांचा समावेश आहे. बहादूरशेखनाका-चिंचनाका-पॉवर हाऊस हा रस्ता १५ मीटर रुंदीचा केला जाणार आहे तर अमेय पार्क ते गांधारेश्वर पुल दरम्यानचा रस्ता १२ मीटर रुंदीचा प्रस्तावीत आहे. रस्ता रुंदीकरणात बांधीत होणाऱ्या जमीन मालक, इमारत धारकांना थेट पैशाच्या स्वरूपात मोबदला देणे पालिकेला कठीण बनणार आहे. त्यासाठी (टीडीआर) हस्तांतरणीय विकास हक्क प्रणाली राबवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
शहरातील शिवाजी चौक ते बहादूरशेख हा मुख्य वर्दळीचा रस्ता रुंद करण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रशासनाने रेखांकन प्रक्रिया राबवली. त्यानंतर प्रशासनाकडून रुंदीकरणाच्या कार्यवाहीला प्राथमिक स्तरावर सुरुवात झाली आहे.
---
पाठपुरावा झाला नाही
गेल्या काही वर्षात वर्दळीचे रस्ते रुंद करण्याचे निर्णय झाले. परंतु पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही. परिणामी जैसे थे परिस्थिती राहिली. आता नव्याने यास चालना मिळाली आहे. संपादीत जागा मालकांना टीडीआर दिला जाणार असल्याने रस्ता रुंदीकरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
----
कोट
रस्ता रूंदीकरणाबाबत संबंधित जागा मालक अथवा इमारत धारकांच्या मनात अनेक शंका आहेत. ९ रोजी बैठकीत सर्वांच्या शंकाचे निरसन केले जाइल. चिपळूण शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी मोठ्या रस्त्यांची नितांत गरज आहे.
कपिल शिर्के, बांधकाम सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.