कोकण

देवगडात रविवारी आरोग्य चिकित्सा

CD

देवगडात रविवारी
आरोग्य चिकित्सा
देवगड ः येथील देवगड मेडिकल फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ८) सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत डॉ. आठवले कॅम्पस येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात विविध तपासण्या मोफत करण्यात येतील. आवश्यक असल्यास ५० टक्के सवलतीमध्ये ''क्ष-किरण'' करण्यात येईल. शिबिरात मोफत नेत्र तपासणीही करण्यात येणार आहे. चष्म्यावर ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, मोतिबिंदू शस्त्रक्रिया २० टक्के सवलतीमध्ये करण्यात येईल. शिबिरात डॉ. तन्मय आठवले, डॉ. महेंद्र आचरेकर, डॉ. अर्पिता आचरेकर, डॉ. रिया जैन-आठवले, डॉ. ज्ञानेश्‍वर केदार तपासणी करतील. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुनील आठवले यांनी केले आहे.

कासार्डे येथे आज
शिवजयंती उत्सव
तळेरे : कासार्डे येथील नवतरुण उत्कर्ष मंडळ (रजि.) व राजा शिवछत्रपती ग्रुप याच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळा (तिथीनुसार) उद्या (ता. ६) कासार्डे तिठा येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी ८.३० वाजता स्वीटलँड इंग्लिश मीडियम स्कूल, तळेरे यांचे मर्दानी खेळ, ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या उपस्थित पूजन, ९.३० वाजता नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह मान्यवरांचे सत्कार, विद्यार्थी गुणगौरव, १० वाजता शालेय गट बॉक्स अंडआर्म क्रिकेट स्पर्धा, दुपारी ३ वाजता वाडी मर्यादित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवतरुण उत्कर्ष मंडळ, राजा शिवछत्रपती ग्रुप व कासार्डे ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT