कोकण

-क्राईम

CD

मोटारीच्या धडकेत
तिघेजण जखमी
रत्नागिरी ः बेदरकारपणे मोटार चालवून पुढील दोन दुचाकींना धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले. हा अपघात ३ मार्चला रात्री जेलरोड येथे झाला. सिद्धराज गजानन मयेकर (वय २७, रा. मयेकरवाडी, शिरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अनिल सिंग विक्रमसिंग (वय २३, मुळ रा. राजस्थान, सध्या रा. शांतिनगर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी रात्री अनिल विक्रमसिंग हा दुचाकीने पाठीमागे ओमप्रकाश मेघवाल याला बसवून आठवडा बाजार ते मारुती मंदिर असा जात होता. त्याच सुमारास सिद्धराज मयेकर हा मोटार घेऊन मारुती मंदिरच्या दिशेने जात होता. ही दोन्ही वाहने जेलरोड येथे आली असता सिद्धराजचा मोटारीवरील ताबा सुटला आणि त्याने दुचाकीसह अन्य एका दुचाकीला धडक दिली. यात अनिल विक्रमसिंग त्याच्या मागे बसलेला ओमप्रकाश मेघवाल, तसेच अन्य दुचाकीवरील बिल्किस नदीम दलाल (३५, रा.नाताळ गल्ली राजिवडा,रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बागेतील कामगाराचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील रीळ-भंडारवाडी येथील आंबा बागेत कामाला असलेल्या कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना ४ मार्चला सकाळी ८ च्या सुमारास घडली. हरीराम दुल्हारे चौहान (वय ६०, रा. रिळ-भंडारवाडी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हरीराम चौहान हा रीळ-भंडारवाडी येथील अमरनाथ अवधूत चव्हाण यांच्या आंबा बागेत कामाला होता. ४ मार्चला सकाळी ६.३० वा.सुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे अमरनाथ चव्हाण यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात केले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भाजलेल्या वृद्धेचा
उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी ः दापोली तालुक्यातील हर्णै येथे चुलीवर पाणी तापवत असताना चुलीत आगीचा भडका उडून भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना ५ मार्चला सकाळी घडली. शेवंती बाळकृष्ण चौधरी (वय ६७, रा. हर्णै, दापोली) असे मृत वृद्धेचे नाव आहे. त्या ३ मार्चला घरी सकाळी चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापवत होत्या. त्यावेळी अचानकपणे चुलीत आगीचा भडका उडाल्यामुळे त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्या भाजून जखमी झाल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र दापोली येथे नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारांदरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याची जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT