कोकण

गोवन स्ट्रायकर्स संघ उपांत्य फेरीत

CD

swt५२९.jpg
२८८६८
कुडाळ ः गोवन स्टायकर्स गोवा संघाच्या अमीर गडेकरला सामनावीरने गौरविण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)

गोवन स्ट्रायकर्स संघ उपांत्य फेरीत
कुडाळातील क्रिकेट स्पर्धा ः अमीर रेडकर ''सामनावीर''
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः प्रिन्स स्पोर्टस् क्लब, समादेवी मित्र मंडळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरुर आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना गोवन स्ट्रायकर्स व मनोज इलेव्हन यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना मनोज इलेव्हन यांनी ४० धावा जमवल्या. गोवा संघाने हे आव्हान चार षटकांत पूर्ण केले. या संघाचा अमीर गडेकर सामनावीराचा मानकरी ठरला.
आजचा पहिला सामना सिंधुदुर्ग एम.आर. व ए वन पिंगुळी यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना पिंगुळी संघाने युसुफ याच्या १४ चेंडूतील २१ धावांच्या जोरावर मर्यादित सहा षटकांत ५० धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल वामन कावले यांच्या १५ चेंडूतील २४ धावांच्या जोरावर पाचव्या षटकात ५१ धावांचे उद्दिष्ट पूर्ण करून सिंधुदुर्ग एम. आर. संघाने विजय मिळविला. वामन कावले सामनावीर ठरला. दुसरा सामना गोवन स्ट्रायकर्स गोवा व मनोज ११ यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना मनोज इलेव्हन कसवन संघाने ४४ धावा जमवल्या, तर ४५ धावांचे आव्हान गोवन स्ट्रायकर संघाने पार केले. या संघातील अमीर गडेकर याने चार गडी बाद करून सामनावीर पुरस्कार पटकावला. तिसरा सामना सिंधुदुर्ग एम. आर. व गोवन स्ट्रायकर यांच्यात झाला. सिंधुदुर्ग एम. आर. संघाने प्रथम फलंदाजी करताना ३३ धावा जमवल्या. गोवन स्ट्रायकरने साईशच्या २१ धावांच्या जोरावर हा सामना सहज जिंकला. सामनावीर पुरस्काराचा मानकरी साईश झोरे ठरला. चौथ्या सामना ए वन पिंगुळी व मनोज इलेव्हन यांच्यात होऊन प्रथम फलंदाजी करताना पिंगुळी संघाने अवघ्या वीस धावा जमवल्या. मनोज इलेव्हनने हे आव्हान सहज पार केले. दोन षटकांत सहा धावा व तीन गडी बाद करणाऱ्या कणकवली संघाच्या गौरव घुंगरटला सामनावीर घोषित करण्यात आले.
पाचवा सामना सिंधुदुर्ग एमआर व मनोज इलेव्हन यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग एम. आर. संघाने अमीन (१२) गोविंद (१८ )यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४२ धावा जमवल्या; मात्र वैभव परब (१३), विशाल (१३) आणि दर्पण (१२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर हे आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केले. वैभव परब सामनावीर ठरला. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मांजरेकर, मंगेश धुरी, बंटी केरकर यांनी काम पाहिले. समालोचन काका सावंत, राजा सामंत, बादल चौधरी, विजय बागायतकर, शेखर दळवी यांनी केले. गुणलेखन रुपेश कुडाळकर, सचिन कांबळे, समीर राणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT