कोकण

घरकुलांचे अनुदान तातडीने द्या

CD

28967

घरकुलांचे अनुदान तातडीने द्या

ठाकरे शिवसेना; कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः तालुक्यातील प्रधान मंत्री आवास योजनेतून लाभाऱ्यांनी घरे बांधून पूर्ण केली, अशा लाभार्थ्यांना अनुदान त्वरित वितरित करा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्यावतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार नुकतीच करण्यात आली. पक्षाच्यावतीने आज येथील गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांना जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार नाईक यांच्या सुचनेनुसार निवेदन दिले.
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र चव्हाण, पंचायत समिती अधिकारी श्री. डोईफोडे व लाभार्थी उपस्थित होते. श्री. सडवेलकर यांनी सांगितले, की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे लाभार्थींना अनुदान प्राप्त होण्यास विलंब झाला असेल. मात्र, काही लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाली व प्रस्ताव करताना परिपूर्ण कागदपत्रे सादर झाल्यावरच योजनेचा लाभ मिळाला आहे. काही गावांमध्ये निवडणुकांचा राग लाभार्थ्यांवर काढून काही किरकोळ तक्रारी करून अनुदान थांबवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. म्हणूनच आज काही लाभार्थ्यांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी वालावलकर यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावर श्री. वालावलकर यांनी, ज्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झाली आहेत, त्यांना अनुदान लवकरच दिले जाईल. काही तक्रारी प्राप्त झाल्या तर अशांची खातरजमा करून त्यात त्रुटी असतील तर त्या दूर करून अनुदान दिले जाईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola : पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावाधाव, नर्सपासून डॉक्टरांपर्यंत विनवण्या; कुणीच मदत केली नाही, VIRAL व्हिडीओने खळबळ

मान्सून महाराष्ट्रात दाखल! पुण्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

महागाईचा भडका! घरगुती LPG सिलिंडरच्या दरात वाढ, १४.२ किलो सिलिंडरची नवी किंमत किती

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

'माधुरीनं माझ्या पत्नीचे कपडे घालून शूटिंग केलं' : टॅक्सीचेही पैसे नव्हते; अभिनेत्याने केलेला मोठा खुलासा, म्हणालेला...

SCROLL FOR NEXT