कोकण

आंबा, काजू बागायतदारांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या

CD

आंबा, काजू बागायतदारांना
हेक्टरी ५० हजाराची मदत द्या
निकमांची मागणी ; युद्धामुळे निर्यातीत अडचण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतीचे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बागायतदारांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत केली. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंबा निर्यातीत निर्माण झालेल्या अडचणींबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
आमदार निकम म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ९९ टक्के आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाढलेली उष्णता, परागीकरणासाठी मधमाशांची घटती संख्या तसेच लोटे व खेड परिसरातील रासायनिक कंपन्यांमुळे निर्माण होणारे पर्यावरणीय परिणाम या विविध कारणांमुळे बागायतीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतलेला नसल्याने त्यांना विमा भरपाई मिळणार नाही. त्यामुळे सर्व बागायतदारांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
आंबा निर्यातीबाबत बोलताना ते म्हणाले, कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणावर दुबईसह आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. पर्याय म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा या देशांमध्ये आंबा निर्यात करण्याचा विचार केला जात असला तरी विमान प्रवासाचे वाढलेले तिकीट दर शेतकऱ्यांसाठी परवडणारे नाहीत. त्यामुळे या तिकीट दरांबाबत शासनाने विशेष सवलत देण्याचा विचार करावा.
याबाबत कृषीमंत्री म्हणाले, आमदार निकम यांनी उपस्थित केलेला मुद्दा रास्त असून कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या अडचणी शासनाच्या लक्षात आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर परिणाम होत असल्याने तसेच शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT