कोकण

जागतिक महिला दिनी ''जल महोत्सवा''चा प्रारंभ

CD

जागतिक महिला दिनी ‘जल महोत्सवा’चा प्रारंभ
वैदेही रानडे ; गावातील जलस्रोतांचे होणार संरक्षण
सकाळ वृ्त्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक महिला दिन ८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत ‘जल महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. ‘आपले गाव, आपले स्रोत’ या संकल्पनेतून गावातील जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे प्रतिमाणसी किमान ५५ लिटर दर्जेदार पाणीपुरवठा करणे हे या मिशनचे प्रमुख ध्येय आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनापासून ते २२ मार्च जागतिक जल दिनापर्यंत जल महोत्सव पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) सागर पाटील म्हणाले, पिण्याच्या पाण्याला केवळ गरज न मानता त्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जेचा वापर आणि देखभाल-दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यावरही यात भर दिला जाणार आहे. आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जल सेवेशी जोडणारा हा उपक्रम सर्व ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावा.

चौकट
ग्रामपंचायत स्तरावर राबवले जाणार उपक्रम
जल महोत्सवात फिल्ड टेस्टिंग किट (FTK)वापरून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. यासाठी गावातील महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मिळून गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्यासाठी आपले गाव, आपला पाण्याचा स्रोत अशी संकल्पना रूजवण्यात येणार आहे. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण करून सामुदायिक शपथ घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा प्राधान्याने समावेश करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT