कोकण

रत्नागिरी-पावस विद्यामंदिरची सीमावर नाटिका प्रथम

CD

Rat6p20.jpg
29038
रत्नागिरी ः राज्यस्तरीय आंतरशालेय पर्यावरण बालनाट्य स्पर्धेतील द्वतीय पारितोषिक पटकावणारा अ. के. देसाई हायस्कूलचा चमू. ( नरेश पांचाळ - सकाळ छायाचित्रसेवा )
-----------------
पावस विद्यामंदिरची सीमावर नाटिका प्रथम
पर्यावरण बालनाट्य स्पर्धा ; देसाई हायस्कूलची वरदान द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय पर्यावरण बालनाट्य स्पर्धेत पावस येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरच्या सीमापार नाटिकेला प्रथम, तर मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या ‘वरदान’ या नाटिकेला द्वितीय क्रमांक मिळाला.
कांदळवन कक्ष महाराष्ट्र वन विभाग, मॅनग्रीव्हज फाउंडेशन मुंबई, इकोफॉक्स वेंचर्स मुंबई, रत्नागिरी नगरपालिका आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूर यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती.
फाटक हायस्कूलच्या सुरक्षा कवच या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. वरदान या नाटिकेच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी संतोष गार्डी यांना द्वितीय व लेखनासाठी तृतीय क्रमांक, तर उत्कृष्ट अभिनयासाठी द्वितीय क्रमांक महेक सलीम मुल्ला हिला प्राप्त झाला. या नाटिकेमध्ये महेक मुल्ला, पूर्वा कांबळे, लावण्या साळुंके, मैथिली कांबळे, पुनीका दाभोळकर, हर्ष वाणी, जियान होडेकर, दानिश शेख, सर्वेश सोडिये, शुभम सूर्यवंशी, रेहान मुजावर, अभंग सूर्यवंशी, आयशा ठुमके, आस्मा साखरकर, पौर्णिमा सनगरे, अंकिता पवार, तन्वी ताम्हणकर, जोया हडपोलकर, गंगा देवांगण, विद्याश्री बळनागुर ,जीविका खडसे यांनी अभिनयाची चूणूक दाखविली. या उल्लेखनीय यशाबद्दल मराठा मंदिरचे अध्यक्ष योगेश पवार आणि सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

SCROLL FOR NEXT