कोकण

रिझर्व्ह बँक योजनांची जागृती आवश्यक

CD

29239

रिझर्व्ह बँक योजनांची जागृती आवश्यक

पुनीत पांचोली : माडखोल येथे आर्थिक साक्षरता कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
माडखोल, ता. ७ : ‘‘भारतीय रिझर्व्ह बँक ही केवळ नोटांशी संबंधित नसून देशाच्या आर्थिक विकासात तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी मैलाचा दगड ठरू शकतात. या योजनांची जनजागृती करणे आणि त्यांची परिपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा बँकेचा अविभाज्य घटक आहे,’’ असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पांचोली यांनी केले.
भारतीय रिझर्व्ह बँक, वित्तीय समावेशन व विकास विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली माडखोल (ता.सावंतवाडी) येथील श्री भगवती प्रसाद हॉलमध्ये ‘वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पुनीत पांचोली यांच्या हस्ते झाले.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे (पुणे) मुख्य महाव्यवस्थापक शंकर सेन, झोनल मॅनेजर (रत्नागिरी) नरेंद्र देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे (पुणे) सहायक महाव्यवस्थापक दीपक पाटील, रिझर्व्ह बँक मुंबईचे व्यवस्थापक अरुण बाबू, सिंधुदुर्गचे एलडीएम विशाल गोंडके, ऋषिकेश गावडे, सागर निकम, प्रमोद गावडे, श्रीपाद दामले, उपसरपंच नीलेश वालावलकर, दत्ताराम कोळमेकर आदी उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक शंकर सेन म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना हे सर्वसामान्य जनतेचे मुख्य आधार आहेत. या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेची टीम कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचा मोठा ग्राहकवर्ग असून त्यांनी या शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची वेळेवर आणि प्रामाणिकपणे परतफेड केल्यास बँकेचा ग्राहकावरील विश्वास अधिक दृढ होतो.’’ यावेळी महिला बचत गट आणि विविध उद्योजकीय योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात श्री. पाटील यांनी सिबिल स्कोअरबाबत माहिती दिली. सध्या समाजात सायबर क्राईम आणि मोबाईलद्वारे होणारी फसवणूक वाढत आहे. यापासून वाचण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. वेळीच जागरूक झाल्यास भविष्यातील मोठे आर्थिक नुकसान टाळता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशाल गोंडके यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे ऋषिकेश गावडे व धैर्यशील परभणीकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

तिकिटावरून वाद, आधी शाब्दिक चकमक, नंतर बेदम हाणामारी; चालत्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशाचा तुफान राडा, पाहा व्हिडिओ

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

SCROLL FOR NEXT