- rat७p४.jpg-
P२६O२९२२२
रत्नागिरी ः राज्यस्तरीय आंतरशालेय पर्यावरण बालनाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पटकावणारा पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचा चमू.
-----
स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचे ‘सीमापार’ प्रथम
पर्यावरण बालनाट्य महोत्सव ; कांदळवन संवर्धनाला हातभार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : कांदळवन कक्ष, मॅन्ग्रोव्हज फाउंडेशन, इकोफॉक्स व्हेंचर्स, रत्नागिरी नगरपालिका आणि कोल्हापूरची प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या पर्यावरण बालनाट्य महोत्सवात स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर (पावस) च्या ‘सीमापार’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.
या महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (रत्नागिरी शाखा) अध्यक्ष समीर इंदुलकर व वैभव बोंबले यांच्या हस्ते झाले. या पर्यावरण बालनाट्य महोत्सवात तालुक्यातील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर (पावस) च्या ‘सीमापार’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या ‘वरदान’ नाटकाला द्वितीय, तर फाटक हायस्कूलच्या ‘सुरक्षा कवच’ या नाटकाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी अजिंक्य वनमोरे, इकोफॉक्स व्हेंचर्सचे परेश पिंपळे, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या जयश्री देसाई, परीक्षक अनिल दांडेकर, स्वानंद मयेकर, गणेश राऊत आणि ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. मुलांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगांमधून प्रामुख्याने कांदळवन संवर्धन आणि संरक्षण या विषयावर प्रभावी प्रबोधन करण्यात आले. लहानग्या कलाकारांच्या जिवंत अभिनयाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
------
वैयक्तिक पारितोषिके
* सर्वोत्कृष्ट अभिनय (मुली) : देवश्री सामंत, महेक मुल्ला, इरा गोखले.
* सर्वोत्कृष्ट अभिनय (मुले) : अर्णव सरपोतदार, वेदांत देवस्थळी, सोहम कदम.
* सर्वोत्कृष्ट लेखन : हरीश सामंत, योगेश कदम, संतोष गार्डी.
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : अक्षय नाईक, संतोष गार्डी, मोहन बापट.
------
कोट
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला पर्यावरण बालनाट्य महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवात विविध शाळांतील बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या अभिनयातून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले आहे.
- किरण ठाकूर, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.