कोकण

रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

CD

रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : महिलांना उद्योगिनी बनवताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे गेले १८ वर्षे काम करणाऱ्या रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन जयेश मंगल कार्यालय येथे पार पडले.
या वेळी रत्नागिरीच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रीती सुर्वे यांनी फीत कापून उद्‍घाटन केले तर या वेळी पावस गणातून निवडून आलेल्या आणि रत्नागिरी ग्राहक पेठच्याच सदस्य स्वाती शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजशेखर मलुष्टे आणि जयेश मंगल पार्कचे व्यवस्थापक ओंकार रहाटे आणि ग्राहक पेठच्या संचालिका प्राची शिंदे, पालघरचे माजी नगरसेवक प्रल्हाद तथा बाबा कदम उपस्थित होते. प्रीती सुर्वे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठच्या गेले १८ वर्षाच्या सातत्याचे कौतुक करताना महिलांना जिद्दीने त्यांच्या पायावर उभे करणारे हे व्यासपीठ असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या स्वाती शिंदे यांनी याच ग्राहक पेठमुळे माझ्यासारख्या गावात राहणाऱ्या महिलेला प्राची शिंदे यांनी पुढे येण्याची संधी दिली, इथली सुरुवातच आयुष्य बदलून गेली, उद्योगिनी आणि आता लोकप्रतिनिधी अशी ओळख मिळाली असे आवर्जून सांगितले. याप्रसंगी अॅड. राजशेखर मलुष्टे यांनी उद्योगिनी महिलांना बचतीचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. या वेळी संचालिका प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सोमवार (ता. ९) पर्यंत हे प्रदर्शन व विक्री जयेश मंगल कार्यालय येथे चालू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT