कोकण

मराठीचा अभिमान बाळगा- प्रकाश दळवी

CD

- rat७p५.jpg-
२६O२९२२३
रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयात मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाला उपस्थित डावीकडून अध्यक्ष प्रकाश दळवी, डॉ. शरद प्रभुदेसाई आणि शैलजा लिमये.
----
मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगावा
प्रकाश दळवी ः जनसेवा ग्रंथालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र होणे आवश्यक आहे. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीने आपल्या भाषेचा सार्थ अभिमान बाळगावा आणि दैनंदिन जीवनात तिचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले.
येथील लक्ष्मी चौक परिसरातील जनसेवा ग्रंथालयात आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी अध्यक्ष प्रकाश दळवी आणि सदस्य डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाश दळवी यांनी सुरेश ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक ग्रंथालयाला भेट दिले. आपल्या मनोगतात दळवी यांनी सांगितले की, ‘मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, विं. दा. करंदीकर, भालचंद्र नेमाडे आणि वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज ही सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्ने आहेत. कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती ज्ञानभाषा होण्यासाठी थोर साहित्यिकांनी मोलाचे योगदान दिले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT