कोकण

जिवंत गावठी बॉम्ब ठेवणाऱ्याला अटक

CD

जिवंत गावठी बॉम्ब
ठेवणाऱ्याला अटक

हिवाळेत कारवाई; नदी काठावरच प्रकार

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता.७ : स्फोटक पदार्थांच्या साहाय्याने मानवी जीवितास धोका पोहोचवण्याच्या आणि मालमत्तेची हानी करण्याच्या उद्देशाने जिवंत गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी आचरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित प्रकाश दत्ताराम परब (वय ६७, रा. हिवाळे खालची परबवाडी, ता. मालवण) यांना शुक्रवारी (ता.६) पहाटे ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ही घटना गुरुवारी (५ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास कसाल नदीच्या किनारी, हिवाळे-परबवाडी येथे घडली. येथे गावठी बॉम्ब आढळून आले. या प्रकरणाची माहिती हिवाळे गावचे पोलिसपाटील वीरेंद्र दिनेश कदम (वय ५४, रा. हिवाळे बौद्धवाडी) यांनी आचरा पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, मालवण पोलिस निरीक्षक जगताप, साहाय्यक पोलिस निरीक्षक माने, उपनिरीक्षक टेंबूलकर, गाडेकर, साटम आदी अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन जिवंत गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. अधिक सुरक्षिततेसाठी बॉम्बशोध व नाशक पथकास (BDDS) पाचारण केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक टेंबूलकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT