कोकण

महिलांनी आरोग्याबाबत जागृत राहावे

CD

29241

महिलांनी आरोग्याबाबत जागृत राहावे

डॉ. उज्वला सावंत : कुडाळमध्ये महिला दिन उत्साहात

कुडाळ, ता.७ : ‘‘महिलांनी आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असायला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना महिलांच्या आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचे वारंवार सांगत असते. त्यामुळे दैनंदिन कामातून स्वतःसाठी एक तास वेळ देऊन महिलांनी शारीरिक व्यायाम केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन सुमेध लॅबच्या संचालिका व इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सदस्या डॉ. उज्वला सावंत यांनी केले.
गिअरअप जिम येथे जागतिक महिला दिन आरोग्यदायी आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिमचे संचालक हेमंत जाधव व साईराज जाधव यांनी महिलांसाठी ‘पॉवर-पॅक्ड फिटनेस, फन आणि कार्डिओ वर्कआउट’ अंतर्गत फिट टंबोला, स्कॉट होल्ड आणि विविध फिटनेस गेम्सचे आयोजन केले होते. यामध्ये जिममधील सर्व महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला सुरेखा धडाम, अनुष्का रेवंडकर, उज्वला सावंत, कविता शेळके, करुणा जळवी, सुविधा वाळवे, संजना परब, शिल्पा शिरसाट, सिद्धी भणगे, श्वेता कुडाळकर, सोनल पिंगुळकर, स्नेहा पावसकर, आराध्या कोचरेकर आणि दिव्या गावडे उपस्थित होत्या.
प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात महिलांनी व्यायामासंदर्भातील शंका उपस्थित केल्या. जिमचे मालक आणि उच्च प्रशिक्षित ट्रेनर साईराज जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यामध्ये व्यायामापूर्वीचा आणि नंतरचा आहार , शरीरातील कॅल्शियम व विटामिन्सचा समतोल, स्नायूंची क्षमता आणि स्ट्रेंथ कशी वाढवायची, अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. करुणा जळवी यांनीही महिलांसाठी व्यायामाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमात जिमचे ट्रेनर पंकज गावडे, दर्शन मयेकर, मकर घाडी आणि ज्ञानेश्वर आळवे यांचे सहकार्य लाभले. यावेळी उद्योजिका दिव्या गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
----
जिच्या हाती पाळण्याची दोरी...
प्रा. अनुष्का रेवंडकर म्हणाल्या , ‘‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धारी’’ या उक्तीप्रमाणे स्त्री ही पुरुषा इतकीच कुटुंबातील जबाबदार व्यक्ती आहे. समाज घडवण्याच्या प्रक्रियेत स्त्रीचे मोठे योगदान आहे. राजमाता जिजाऊंनी बालशिवाजींवर उत्तम संस्कार केले, म्हणून महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेतृत्व मिळाले. सावित्रीबाई फुलेंच्या योगदानामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली. अशीच ताकद प्रत्येक महिलेकडे आहे, त्यासाठी त्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

तिकिटावरून वाद, आधी शाब्दिक चकमक, नंतर बेदम हाणामारी; चालत्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशाचा तुफान राडा, पाहा व्हिडिओ

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

SCROLL FOR NEXT