29242
बुद्धिबळ स्पर्धेत ‘मुक्ताई’चे यश
सावंतवाडी, ता.७ : डेरवण (चिपळूण) येथील श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने आयोजित केलेल्या १६ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत येथील मुक्ताई ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
राज्यभरातील १०६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुक्ताई ॲकॅडमीचे विद्यार्थी मागील ९ वर्षे सातत्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके मिळवत आहेत.
ॲकॅडमीच्या हर्ष राऊळ, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, पुष्कर केळूसकर या आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त (Rated) विद्यार्थ्यांसोबत सात वर्षीय आकाश वाटवे, चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो आणि दर्श सावंत या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
सात राऊंड्सच्या या स्पर्धेत मुख्य गटात पार्थ गावकर याने ५ गुण मिळवून नववा क्रमांक, हर्ष राऊळ याने ५ गुण मिळवून १२ वा क्रमांक, पुष्कर केळूसकर याने ५ गुण मिळवून १३ वा क्रमांक, तर लिएण्डर पिंटो याने ५ गुण मिळवून १५ वा क्रमांक पटकावला. तसेच १६०० रेटिंगच्या गटात चिदानंद रेडकर याने ५ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला.
ॲकॅडमीचे अध्यक्ष व बुद्धीबळ प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर आणि जिल्ह्यातील टॉप रेटेड आंतरराष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व स्तरांतून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.