- rat७p९.jpg-
P२६O२९२३४
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘गो-कार्ट डिझाइन चॅलेंज’ स्पर्धेत देशात बारावा क्रमांक पटकावलेला राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ.
-----
‘माने महाविद्यालया’ची राष्ट्रीय पातळीवर छाप
राष्ट्रीय गो-कार्ट स्पर्धा ; देशात १२ वा तर राज्यात दुसरा क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
देवरुख, ता. ७ : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टीम फुल थ्रोटल’ने तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘गो-कार्ट डिझाइन चॅलेंज’ स्पर्धेत राज्यात दुसरा, तर संपूर्ण भारतात १२ वा क्रमांक पटकावला.
करी मोटर स्पीडवे येथे पार पडलेल्या ‘इसनी मोटारस्पोर्ट फॉर्म्युला गो-कार्ट डिझाइन चॅलेंज’च्या १३ व्या हंगामात देशभरातील ५९ दिग्गज संस्थांच्या टीम सहभागी झाल्या होत्या. टाटा मोटर्स, जनरल मोटर्स, होंडा आणि फोर्ड यांसारख्या नामवंत कंपन्यांच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी टीमला अनेक खडतर टप्प्यांतून जावे लागले. यामध्ये तांत्रिक चाचणी, डिझाइन प्लॅन, कॉस्ट अँड सेल्स पिच चॅलेंज, ब्रेक टेस्ट आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘इंड्युरन्स टेस्ट’ अशा विविध चाचण्यांचा समावेश होता. रेस, ऑटोक्रॉस आणि स्किडपॅड यांसारख्या डायनॅमिक इव्हेंट्समध्ये टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे, ‘सेल्स पिच चॅलेंज’मध्ये या संघाने देशात पाचवा क्रमांक पटकावला.
अभियांत्रिकीच्या पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि मेहनतीने ही ‘गो-कार्ट’ कार विकसित केली आहे. या यशात त्यांना डॉ. अच्युत राऊत आणि प्रा. श्रवण करकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा नेहा माने, सीईओ प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि सर्व विभागप्रमुखांनी टीमचे अभिनंदन केले.
----
१८ सदस्यीय टीमची मेहनत
संघाचे नेतृत्व कर्णधार रितेश शिंदे आणि उपकर्णधार सृजन शिरकर यांनी केले. संघात अभिजित देवरुखकर, ओंकार भुवड, आदित्य पाटणकर, संतोष तांबे, सुजल जाधव, पार्थ खामकर, साईप्रसाद वरक, विशाल पाटील, तन्मय मयेकर, ओंकार पाटील, साहिल साळवी, प्रतीक गावडे, अपेक्षा हेलोडे, राजनंदिनी गदाले, वृश्चिका मसुरकर आणि प्राजक्ता चव्हाण या १८ सदस्यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.