कोकण

समाधान शिबिर खेडमध्ये सुरू

CD

समाधान शिबिर
खेडमध्ये सुरु
खेड : येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीने ‘महसूल समाधान शिबिर (टप्पा १) अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सिंगल विंडो’ पद्धतीचा वापर करून नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये फेरफार नोंदी, सातबारा व ८-अ उतारा, उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, तसेच नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे तत्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय ई-मोजणी, आधार सेवा, पी.एम. किसान योजना आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यांसारख्या सुविधाही नागरिकांना मिळतील. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या मंडल स्तरावर आयोजित या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी केले आहे.

तुषार कोकमकर
राज्यात १६ वा
चिपळूण : कळंबट येथील तुषार कोकमकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत राज्यात १६ वा क्रमांक मिळवला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्याची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तुषार कोकमकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गांधी प्रतिष्ठानतर्फे
स्वच्छता मोहीम
चिपळूण : पेठमाप, गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर यांचा शिमगा महोत्सव उत्साही वातावरणात नुकताच पार पडला. या महोत्सवात शेरणे काढण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम पेठमाप येथील नदीकाठच्या सीमेवर होत असतो. तेव्हा भरणाऱ्या हजारो लोकांच्या यात्रेमुळे या परिसरात कागद, प्लॅस्टीक, प्लॅस्टीकच्या बाटल्या, चमचे, डीश,आईस्क्रीमचे कप, तुटके‌ चप्पलस् असा विविध स्वरूपाचा कचरा निर्माण होतो. गांधी प्रतिष्ठानच्या वतीने येथे गुरुवारी स्वच्छता मोहीम घेऊन हा सर्व कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करून प्रतिष्ठानला धन्यवाद देण्यात येत आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, सचिव सुनील‌ खेडेकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य दीपक महाडिक, दीपक कदम, सदस्य सुनीता महाडिक, ॲड. आशय होमकळस, अमृता होमकळस, हेमा होमकळस, प्रशांत सातारकर, छाया सातारकर, करंजेश्वरी देवस्थानचे विश्वस्त अजित पावसकर, माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन दोन तास श्रमदान केले.

रायपाटणमध्ये
रिक्षा सुंदरी स्पर्धा
राजापूर : तालुक्यातील रायपाटणची ग्रामदेवता श्री वडची आईचा होळी उत्सव सुरु झाला असून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी जोरदार प्रतिसाद लाभलेल्या तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी ही मानाची स्पर्धा यावर्षी १६ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद लाभला होता. अनेक रिक्षा चालकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखविताना उपस्थितांची मने जिंकली होती. मागील वर्षाप्रमाणेच या होळी उत्सवात रिक्षा सुंदरी स्पर्धा १६ मार्चला आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रिक्षा चालक किंवा मालकांनी आपली नावे उमेश पराडकर आणि बाळू राणे यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT