rat7p19.jpg
29275
कुंबळे ः येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाबाबत नागरिकांना माहिती देताना तहसिलदार अक्षय ढाकणे व अधिकारी.
महसूल समाधान शिबिर अभियानाला कुंबळे येथून प्रारंभ
मंडणगड, ता. ७ : तालुक्यातील नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानाचा कुंबळे येथून प्रारंभ झाला. कुंबळे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी तहसीलदार अक्षय ढाकणे, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, मयूर पोळ, मनोहर पवार, कुंबळेचे माजी सरपंच किशोर दळवी, पोलीस पाटील नूरहसन कडवेकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना मार्गदर्शन करताना तहसीलदार अक्षय ढाकणे म्हणाले की, "नागरिकांच्या तक्रारींचे जागीच निवारण करणे, प्रलंबित प्रकरणांवर जलद कार्यवाही करणे आणि प्रशासन व जनता यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे."
या शिबिरात महसूल विभागासह कृषी, पंचायत समिती, आरोग्य, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, बँक, पोस्ट, आधार, निवडणूक आणि वन विभाग अशा विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. नागरिकांना प्रत्यक्ष लाभ वितरण, नोंदणी आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सातबारा व फेरफार नोंदी, वारस तपास, उत्पन्न, जात व डोमिसाईल दाखले, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ आणि रेशनकार्ड संबंधित सेवांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.