कोकण

मंगळवारी शोधणार खुणा

CD

शीळमध्ये ‘खुणा शोधण्याचा’ सोहळा
मंगळवारी ब्राह्मणदेव-पावणादेवी पालखीची पारंपरिक प्रथा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ : शहरानजीकच्या शीळ येथील श्री ब्राह्मणदेव-पावणादेवी पालखीचा पारंपरिक ‘खुणा शोधण्याचा’ कार्यक्रम मंगळवार, १० मार्च रोजी होणार आहे. सतीचा मळा येथे सकाळी ८ वाजता होणाऱ्या या अनोख्या प्रथेचा थरार ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
कोकणातील शिमगोत्सवामध्ये उत्सवानंतर ‘खुणा’ शोधण्याची किंवा घालण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. उत्सवाच्या सांगतेवेळी विशिष्ट ठिकाणी लपवलेली ‘खूण’ ग्रामदेवतेची पालखी शोधून काढते. शिमगोत्सवात देवाचे कार्य कोणतीही चूक न होता निर्विघ्नपणे पार पडले आहे की नाही, याची खातरजमा खुद्द ग्रामदेवतेकडून करून घेण्यासाठी ही प्रथा पाळली जाते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
शीळ येथे काही दिवसांपूर्वीच ग्रामदेवता श्री नवलादेवीच्या पालखीने ही खूण शोधली होती. त्यानंतर आता श्री ब्राह्मणदेव-पावणादेवीची पालखी परंपरेनुसार तिसऱ्या वर्षी ही खूण काढणार आहे. ग्रामदेवतेप्रति असलेली श्रद्धा दृढ करणारी ही प्रथा राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे. या प्रथेविषयी ग्रामीण भागात अनेक रंजक कथा सांगितल्या जातात, त्यामुळे भाविकांमध्ये या सोहळ्याविषयी मोठे कुतूहल असते. या दैवी शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळाचे व्यवस्थापक नागरेकर, पुजारी, भोवड आणि भंडारी बंधूंनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT