कोकण

‘महाराजस्व‘ शिबिराला बांद्यात प्रतिसाद

CD

29294

‘महाराजस्व’ शिबिराला बांद्यात प्रतिसाद

विविध दाखले; कामांचा तातडीने निपटारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ : येथील ग्रामपंचायत सभागृहात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत’ आयोजित समाधान शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरिकांच्या कामांचा तात्काळ निपटारा केला. सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान झालेल्या शिबिरात सर्वप्रकारचे शासकीय दाखले, महसुली समस्यांचे निराकरण तसेच महसुली कामांसाठीचे अर्ज स्वीकारण्यात आले.
शिबिरात उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र यांसह विविध कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इतर शासकीय योजनांची माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले जागीच दिले. शिवाय ‘आपले सरकार महा ई-सेवा केंद्र, बांदा’ यांच्या माध्यमातून आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेटची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. ‘‘शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अशा समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिराचा लाभ बांदा, वाफोली, विलवडे, तांबोळी, डेगवे, गाळेल, नेतर्डे, डिंगणे व परिसरातील अन्य गावांतील नागरिकांनी घेतला. विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अर्जांची तपासणी करून त्यांची कामे तात्काळ मार्गी लावली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्या प्रियांका देसाई, बांदा सरपंच प्रियांका नाईक, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, तांबोळी सरपंच वेदिका नाईक, बांदा महसूल मंडल अधिकारी श्रीमती पाटील, बांदा महसूल अधिकारी फिरोज खान, ग्रामविस्तार अधिकारी आदम शहा, महसूल उपविभागीय अधिकारी समीर घारे, नायब तहसीलदार अपर्णा गावडे, राजेंद्र निपाणीकर, सविता तारी, मंडळ अधिकारी उषादेवी पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT