-rat७p२२.jpg-
P२६O२९२९८
अमृता सोमण
------
अमृता सोमण यांचे निधन
रत्नागिरी ः स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापिका अमृता सोमण (वय ५९) यांचे आळंदी येथे राहत्या घरी निधन झाले. पतसंस्थेच्या सर्व १७ शाखांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा परिवार आहे.
सन १९९२ पासून सन २०१३ पर्यंत सोमण यांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या व्यवस्थापिका म्हणून अत्यंत प्रभावी काम केले होते. अकौंटिंग, ऑफिस रेकॉर्ड, इतिवृत्त, लिखाण या महत्त्वाच्या बाजू त्यांनी अत्यंत अचूक पद्धतीने हाताळल्या. त्यांच्या कारकिर्दीत ‘स्वरूपानंद’ला सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. प्रारंभी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर त्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केले ते कधीही विसरता येणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत अॅड. दीपक पटवर्धन यांनी संस्थेचे वतीने श्रद्धांजली वाहताना सांगितले.
------
-rat७p२३.jpg-
P२६O२९२९९
भिकाजी बडे
---------
भिकाजी बडे यांचे निधन
रत्नागिरी ः पटवर्धन हायस्कूलचे माजी शिक्षक भिकाजी बाळकृष्ण बडे (वय ८३) यांचे दापोली येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.