- rat७p१८.jpg-
२६O२९२६५
चिपळूण ः डेरवण येथील कब्बडी सामन्यातील एक अटीतटीचा क्षण.
----
कबड्डीत भैरवनाथ, पीटीबी संघ विजयी
डेरवण यूथ गेम्स ; राज्यातील संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः डेरवण यूथ गेम्स मधील कबड्डी सामने रंगतदार झाले. पुण्याच्या कबड्डी संघांनी दुहेरी विजेतेपद पटकावले, तर कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या संघांनी वेगवेगळ्या गटाचे विजेतेपद पटकावले.
एसव्हीजेसीटीच्या मैदानात कबड्डीचे एकूण १२७ सामने पार पडले. कबड्डीच्या सर्वच लढती अटीतटीच्या ठरल्या. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विश्वसेवा विद्या, सांगली हा संघाने बारामतीच्या एडीटी शारदा स्पोर्टस संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याच्या भैरवनाथ कबड्डी संघाने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू विद्यालय यांचा पराभव करीत विजेतपद पटकावले. १८ वर्षांखालील मुले गटात कोल्हापूरच्या अनिकेत फाउंडेशन संघाने कोल्हापूरच्याच अण्णासाहेब डांगे संघाचा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. १८ वर्षांखालील मुली या गटात पुण्याच्या पीटीबी संघाने साताऱ्याच्या भैरवनाथ विद्यालय संघाचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.
१४ वर्षांखालील मुले या गटात सांगलीचा विराज बाळाज सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. तर याच वयोगटात सर्वोत्कृष्ट चढाई हे पारितोषिक बारामतीच्या अशरफ शेख याने पटकावले. तर सर्वोत्कृष्ट पकड हे पारितोषिक अवधूत सोडगेने मिळवले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याच्या आराध्या दोडकरने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. सर्वोत्कृष्ट चढाई हा मान कोल्हापूरच्या सई निकमला तर सर्वोत्कृष्ट पकड हा मान पुण्याची ज्ञानेश्वरी बवलेने पटकावला. १८ वर्षांखालील मुले या गटात कोल्हापूरच्या सर्वेश तेहेर हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. तर सर्वोत्कृष्ट चढाईचा मान कोल्हापूरच्या समर्थ रानगेने, तर सर्वोत्कृष्ट पकड हा मानही कोल्हापूरच्याच मंथन सावंतने पटकावला. १८ वर्षांखालील मुली या गटात पुण्याची समृद्धी मुगुरकर सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. तर सर्वोत्कृष्ट चढाईचा मान भैरवी इंगवले या खेळाडूने तर सर्वोत्कृष्ट पकड हा मान पुण्याची माधवी जाधवने पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.