कोकण

रत्नागिरी ः जिथे स्त्रीचा सन्मान, तिथेच समाजाची प्रगती

CD

rat8p5.jpg-
29408
चिपळूण ः महिलांचा सन्मान करताना शाळेचे मुख्याध्यापक संजय वरेकर.

जिथे स्त्रीचा सन्मान, तिथेच समाजाची प्रगती
संजय वरेकरः ‘सकाळ’तर्फे चिंचघरी शाळेत महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः ‘‘महिलांना समान संधी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळाले तर समाज अधिक प्रगत होऊ शकतो. म्हणूनच आपण सर्वांनी महिलांचा आदर करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि समानतेचा विचार पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते,’’ असे प्रतिपादन प्राचार्य संजय वरेकर यांनी येथे केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये ‘सकाळ’ माध्यम समुहाच्या सहकार्याने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्याध्यापक सौ. जगताप यांनी महिला दिनाचा हेतू स्पष्ट केला. ज्येष्ठ कवयीत्री जयश्री यादव यांनी काव्यवचानातून महिला समृद्धीवर प्रकाश टाकला. त्यांनी आईचे जिवनातील महत्व कवितेतून सादर केले. स्त्री ची रूपे आणि अवतार, शेती काम करणाऱ्या महिलांचे जिवन, काश्मिर खोऱ्यात सैनिकांचे निधन झालेल्या पत्नीची अवस्था, यासह स्त्री शक्तीचा जागर करणारा पोवाडाही त्यांनी सादर केला. तसेच विजया पाटील यांनी राजामाता जिजाऊंनी शिवबांना कसे घडवले, याचा प्रवास थोडक्यात मांडला.
यावेळी प्राचार्य वरेकर म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यासाठी शौर्याने लढा दिला. आजही अनेक महिला देशाचा आणि समाजाचा अभिमान वाढवत आहेत. समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या महिला, तसेच आपली आई आणि शिक्षीकांचा आदर्श बाळगायला हवा. संकटाला भिडण्याची, त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी ग्रंथपाल जयंत पवार, संतोष हातणकर, अनंत डोके, पुष्कर कानिटकर, अमोल कोतवाल उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयात सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या दिव्या देवाळे, वंदना समुद्रे, प्रांजल हुमणे, मृणाल सुतार या विद्यार्थींनींचा वाचकवीर पुरस्काराने गौरव करण्यात आला.

चौकट
महिला शिक्षकांचा गौरव
शालेय शिक्षण गुणवत्ता वाढीत विद्यालयातील महिला शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. महिला दिनाचे औचीत्य साधून सर्व महिला शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप, शिक्षिका विनया शिगवण, राजश्री सावंत, विनया धांगडे, सुजाता यादव, प्राजक्ता खेडेकर, गार्गी मिस्त्री, श्वेता चव्हाण ,रूपाली भुवड, स्नेहल भोसले ,माधवी राज शिर्के ,भाग्यश्री निर्मळ, श्वेता मोरे ,शर्मिला महादेव आशा वर्कर कस्तुरी चव्हाण, शुभांगी पवार, शितल कोकीळ, सिमीन चौगुले, वैभवी लाड, स्नेहल वरेकर, शमिका गांगण या नारी शक्तीचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT