कोकण

कला शिकवते सुंदर जीवन जगण्याची दिशा

CD

29432

कला शिकवते सुंदर जीवन जगण्याची दिशा

कल्पना बांदेकर ः कट्टा हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : सुंदर जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने आपल्यामधील कलेत गुंतून घेतले पाहिजे, मग ती कोणतीही कला असो. आपल्यातील अंगभूत कलांची जोपासना करीत आयुष्याला सामोरे गेल्यास जीवन सफल आणि समृद्ध बनेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका आणि अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी कट्टा येथे केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ साहित्यिका कल्पना बांदेकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ कवियत्री संध्या तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सहसचिव साबाजी गावडे, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, मराठी विभाग प्रमुख संजय पेंडूरकर, भूषण गावडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका गावडे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले.
संध्या तांबे यांनी, वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितांमधून माणसाला निसर्गाकडे जाण्याचा मार्ग दाखविला. त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे मत व्यक्त केले. श्री. वराडकर यांनी, मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी शाळांमध्ये आजच्यासारखे कार्यक्रम होणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी साहित्यिका कल्पना बांदेकर यांचा श्री. वराडकर यांच्या हस्ते तर संध्या तांबे यांना संस्थेचे सचिव सुनील नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. रितेश जांभवडेकर, समीक्षा दळवी, ग्रंथपाल श्रेया सुकाळी यांनी अथक परिश्रम घेतले. संजय पेंडूरकर यांनी सूत्रसंचालन केले. समीर चांदरकर यांनी आभार मानले.
---
कलेत गुंता, तणाव बाजूला सारा!
बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचे सार सांगताना अनेक दाखले दिले. त्या म्हणाल्या, ‘‘कला ही आपल्याला सुंदर जीवन जगायला शिकवते. आयुष्यात कसे जगावे, याचे धडे देते; म्हणून ज्यावेळी नकारात्मक विचार येतील, त्यावेळी आपण कलेत गुंतवून घेतले पाहिजे. मानसिक ताणतणाव बाजूला सारून आयुष्यात आलेली सर्व जळमटे आणि किल्मिषे बाजूला सारून आयुष्याला सामोरे जात जीवनाची वाटचाल केली पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

"माझं करिअर सासरच्या लोकांमुळे घडलं" सासू-सासऱ्यांबद्दल मराठी अभिनेत्री व्यक्त; 26 व्या झालेलं नवऱ्याचं निधन

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात विद्युत वाहिनीच्या तारे मधून घर्षण होऊन 2 एकर गहू पिकाची राखरांगोळी

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT