मसुरे डांगमोडे येथे शुक्रवारी
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ८ ः सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यातून मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे शुक्रवारी (ता. १३) श्री देव रवळनाथ मंदिरानजीक मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवतरुण मित्रमंडळ डांगमोडे, स्थानिक ग्रामस्थांतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री देवी भवानीमातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आयोजित ही स्पर्धा सायंकाळी पाचला सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम १० हजार व चषक, द्वितीय सहा हजार व चषक, तृतीय २ हजार व चषक, चतुर्थ क्रमांक २ हजार रुपये, तसेच प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला शिवाजी ठाकूर स्मृती चषक देण्यात येईल. स्पर्धेतील बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंना रोख रक्कम आणि स्मृती चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक संघांनी नितीन हडकर व दत्तप्रसाद पेडणेकर यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.