कोकण

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज करा

CD

फिनोलेक्स अकॅडमीत
एआय, इंडस्ट्री ५.० वर कार्यक्रम
रत्नागिरी, ता. ८ ः येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये १६ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ''रिइमॅजिनिंग टीचिंग एक्सलन्स'' या विषयावर एक आठवड्याचा ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) यशस्वीरित्या पार पडला. इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित या आयएसटीई मान्यताप्राप्त कार्यक्रमात देशभरातील १४ राज्यांमधील १४६ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंडस्ट्री ५.० संकल्पनांची ओळख करून देऊन आधुनिक अध्यापन पद्धतींसाठी सक्षम करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याबाबत प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात डॉ. सुरेंद्रसिंग राठोड (सांगली) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. आयआयटी धारवाड, सौराष्ट्र विद्यापीठ आणि सेंट जोसेफ कॉलेज यांसारख्या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांनी एआय-आधारित मूल्यमापन, ब्लेंडेड लर्निंग आणि ई-पेटंट प्रक्रिया अशा विविध विषयांवर सत्रे घेतली. शिक्षकांनी केवळ माहिती देणारे न राहता ''लर्निंग आर्किटेक्ट'' बनून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी एफडीपी समन्वयक प्रा. सुजय माईणकर, डॉ. शारदा चौगुले आणि डॉ. विनायक भराडी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. विनायक चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज करा
रत्नागिरी ः बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना २०२६-२७ या वर्षासाठी ८०४ जागा राखीव ठेवलेल्या आहेत; परंतु 6 मार्च पर्यंत फक्त ४८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेंतर्गत ८०४ जागा राखीव असून जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्यासाठी www.student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर पालकांनी आपल्या पाल्याचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अचूक माहितीसह भरावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी नीलिमा नाईक यांनी केले आहे. शिक्षण विभाग (प्राथमिक) जि. प. यांजकडून १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीमध्ये पालकांना आपल्या पाल्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेबाबत आवाहन करण्यात आले होते.

आऊटरीच जनजागृती शिबिर आज
रत्नागिरी ः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमइ) व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत लीड जनरेशनच्या उद्देशाने संभाव्य लाभार्थ्यांकडून अर्ज व प्रकल्प प्रस्ताव प्राप्त होण्यासाठी आऊटरीच जनजागृती शिबिर उद्या (ता. १०) सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर नोडल बँक म्हणून बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच मत्स्यव्यवसाय विभाग येथील अधिकारी बँक ऑफ इंडिया तसेच इतर बँकांचे अधिकारी, संभाव्य लाभार्थी उपस्थित राहणार आहेत, असे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

"माझं करिअर सासरच्या लोकांमुळे घडलं" सासू-सासऱ्यांबद्दल मराठी अभिनेत्री व्यक्त; 26 व्या झालेलं नवऱ्याचं निधन

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात विद्युत वाहिनीच्या तारे मधून घर्षण होऊन 2 एकर गहू पिकाची राखरांगोळी

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT