29525
‘सावंतवाडी साईश भाव्यांश’ उपांत्य फेरीत
कुडाळातील ‘डे-नाईट क्रिकेट’; गणेश सातोसकर ‘सामनावीर’
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः येथील क्रीडा संकुलात सुरू असलेल्या प्रिन्स समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजित आंतरराज्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये चौथ्या दिवशी साईश भाव्यांश स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आजचा पहिला सामना सिंधुदुर्ग स्मॅशर्स व टीटीएमएम या संघांमध्ये झाला. ‘टीटीएमएम’ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सिंधुदुर्ग स्मॅशर्स संघाने दिलेले ४२ धावांचे आव्हान पाचव्या षटकांत पार करत टीटीएमएम संघाने पहिला विजय नोंदवला. या संघातील विवेक राजपूत याला सामनावीर पुरस्काराने गौरविले. दुसरा सामना साईश भाव्यांश स्पोर्टस् सावंतवाडी व कुडाळेश्वर पॅकर्स यांच्यात झाला. कुडाळेश्वर संघाने दिलेले २८ धावांचे आव्हान लीलया पार करत सावंतवाडी संघाने विजय मिळविला. या संघातील गणेश सतोस्करला ‘सामनावीर’ घोषित केले. तिसऱ्या सामन्यात साईश स्पोर्टस् संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. टीटीएमएम संघाने मर्यादित पाच षटकांमध्ये ३५ धावा जमवल्या. साईश स्पोर्टने गणेशच्या १८ धावांच्या जोरावर हे आव्हान केले. गणेश सातोस्कर हा सामनावीर ठरला. सिंधुदुर्ग स्मॅशर्स आणि कुडाळेश्वर पॅकर्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग स्मॅशर्सने ३८ धावा केल्या. कुडाळेश्वर संघाला हे आव्हान पार करता आले नाही. सिंधुदुर्ग स्मॅशर्सचा दीपक कुडाळकर ‘सामनावीर’ ठरला. सिंधुदुर्ग स्मॅशर्स व टीटीएमएम या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीटीएमएम संघाने ५५ धावा जमावल्या. यात सिंधुदुर्ग स्मॅशर्सला पराभव पत्करावा लागला. टीटीएमएम संघाचा अमरकांत जांभवडेकर ‘सामनावीर’ ठरला. शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना टीटीएमएम कुडाळ व साईश भाव्यांश स्पोर्ट सावंतवाडी यांच्या दरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना सावंतवाडी संघाने गणेश सातोस्कर (२७ धावा) आणि गिरीश गावडे (२५ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ७४ धावांचा डोंगर उभा केला. टीटीएमएम संघ केवळ ३२ धावा करू शकला. सावंतवाडी संघाच्या गणेश सातोसकर याला सामनावीर पुरस्कार दिला. पंच म्हणून उमेश मांजरेकर, बंटी केरकर, मंगेश धुरी, संदीप रुद्रे यांनी काम पाहिले. समालोचन काका सावंत, राजा सामंत, जय भोसले, बादल चौधरी, विजय बागायतकर, शेखर दळवी यांनी केले. गुणलेखन रुपेश कुडाळकर, सचिन कांबळी, सिद्धेश सावंत व समीर राणे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.